विषय- प्लास्टिक मुक्ती... वास्तव की मृगजळ?
प्लास्टिकच्या कचऱ्याने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर, आपल्या आरोग्यावर होत आहेत. प्लास्टिकचे व्यवस्थापन हे प्रचंड मोठे आव्हान आहे. त्या मार्गाने ही समस्या सोडवण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. त्यामुळे निसर्गातच सामावले जाणारे आणि विघटन करता येईल असे ‘बायो-प्लास्टिक’ विकसित करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. कधी त्यात यश मिळाल्याच्या बातम्या येतात, पण त्या तेवढ्या पुरत्याच. जमिनीवर फारसे बदल झाल्याचे आढळत नाही.
या क्षेत्रात जगभर नेमके काय सुरू आहे, यातील संशोधन कोणत्या टप्प्यात आहे, या संदर्भात भारत कुठे आहे, प्लास्टिक मुक्ती हे केवळ मृगजळ आहे की प्रत्यक्षात येऊ शकते, त्यातून कधीपर्यंत मार्ग निघेल, मार्ग निघालाच तर तो कितपत शाश्वत असेल, त्याच्या काही मर्यादा आहेत का... अशा अनेक प्रश्नांचा मागोवा घेणारा हा ‘भवताल टॉक’. या विषयात गेली कित्येक वर्षे कार्यरत असलेल्या संशोधकांच्या टीमकडून याबाबत प्रत्यक्ष ऐकणे म्हणजे या प्रश्नाचे नेमकेपणाने आकलन करून घेणे.
वक्ते- डॉ. आनंद घोसाळकर (Chief Scientist, Praj Matrix-R&D centre) & संशोधक टीम
रविवार, २९ सप्टेंबर २०२४; सकाळी १० ते १२
ठिकाण- पुणे
आपला प्रवेश निश्चित झाल्यानंतर कार्यक्रमाचे ठिकाण व इतर तपशील कळवले जातील.
नावनोंदणीची लिंक (नोंदणी आवश्यक):
संपर्क- 8446727293 (व्हाट्सअप)/ bhavatalfoundation@gmail.com
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment