Saturday, 14 September 2024

डबेवाले आणि चर्मकार समाजाचे घरांचे स्वप्न होणार साकार 12 हजार घरांच्या निर्मितीसाठी सामंजस्य करार देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती

 डबेवाले आणि चर्मकार समाजाचे घरांचे स्वप्न होणार साकार

12 हजार घरांच्या निर्मितीसाठी सामंजस्य करार

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती

 

मुंबईदि. 13 : मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाजबांधवांसाठी 12 हजार घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला असूनत्यासाठी आज विकासक आणि शासनामार्फत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यातून डबेवाल्यांचे 60 वर्षांपासूनचे स्वप्न येत्या 3 वर्षांत साकार होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ सभागृहात यासंदर्भातील आश्वासन दिले होतेत्याची पूर्तता यानिमित्ताने होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत ही घरे बांधली जाणार असून म्हाडाने यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पासाठी 30 एकर जागा प्रियांका होम्स रियालिटी देणार असूननमन बिल्डर ना नफा ना तोटा’ तत्वावर हे काम करणार आहेत. यातून 12 हजार घरांची निर्मिती होणार असूनती डबेवाले आणि चर्मकार समाजातील बांधवांसाठी उपलब्ध होणार आहेत. प्रत्येकी 500 चौरस फूट आकाराचे घर केवळ 25 लाखात यामुळे दिले जाणार आहे. डब्बेवाला आणि चर्मकार बंधू यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न हे येत्या 3 वर्षात पूर्ण होणार आहे.

आपले डबेवाले जागतिक पातळीवर ख्यातीप्राप्त आहेत. वारकरी वारसा त्यांनी कधीही सोडलेला नाही. आपले तत्त्व आणि निष्ठा त्यांनी कधीही ढळू दिल्या नाहीत आणि म्हणूनच ते व्यवस्थापनातील अतिशय उत्कृष्ट मॉडेल आहे. या घरांसाठी राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईलअसेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहमुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला नमन बिल्डरचे जयेश शाहप्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठीआमदार श्रीकांत भारतीयडबेवाला संघटनेचे उल्हास मुकेचर्मकार निवारा असोसिएशनचे अशोक गायकवाड महाराज उपस्थित होते.

००००


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi