Wednesday, 21 August 2024

बोंडअळीसह किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर - कृषी मंत्री धनंजय मुंडे विविध उपाययोजना तातडीने राबवण्याचे दिले निर्देश

 बोंडअळीसह किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी

कृषी विभाग ॲक्शन मोडवर

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

विविध उपाययोजना तातडीने राबवण्याचे दिले निर्देश

 

            मुंबई, दि २० : राज्यात काही ठिकाणी खरीप पिकांवर व विशेष करून सोयाबीन व कापशीवर बोंडअळी व अन्य किडींचा प्रादुर्भाव असल्याचे उघड झाले. याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला आहे.

            कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी याबाबत आज तातडीने विभागाची बैठक घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी तयार केलेले सोलार लाईट ट्रॅप बाधित शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. हे लाईट ट्रॅप बोंड आळीचे व अन्य किडींचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरले आहेत. तसेच फेरामाईन ट्रॅप व कृषी विद्यापीठाने सुचवलेल्या वेगवेगळ्या फवारण्या आदी बाबत शेतकऱ्यांमध्ये जागृतीचे निर्देश दिले.

            याबाबत आयुक्तस्तरावरून व कृषी विद्यापीठाचे तज्ञांचे यांची एक संयुक्त पथक करून दैनंदिन आढावा घेण्याचे तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुंडे यांनी दिले आहेत.

            या बैठकीस कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोजकृषी आयुक्त रवींद्र बिनवडेकृषी संचालक विनयकुमार आवटेत्याचबरोबर चारही कृषी विद्यापीठातील या विषयाचे तज्ञ यांसह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi