Wednesday, 21 August 2024

संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक विकास आवश्यक

 वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी

ग्रंथालयांचा गुणात्मक विकास आवश्यक

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

            मुंबई,दि.२० : समाजमाध्यमांचा वाढता वापरबदललेली जीवनशैली यामध्ये सुद्धा ग्रंथालयाचे महत्व अबाधित आहे. ग्रंथ आणि ग्रंथालय हे शाश्वत असून वाचनसंस्कृती ही ग्रंथालयांमुळेच टिकून आहे. वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक विकास आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

            शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ता व सेवक यांना डॉ.एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान सोहळा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पाटकर सभागृहएसएनडीटी महिला विद्यापीठ येथे झाला.

            यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,उपसचिव प्रताप लुबाळग्रंथालय संचालकअशोक गाडेकर,राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार, ज्येष्ठ पत्रकार  कुमार केतकर आदी उपस्थित होते. यावेळी पुरस्कारार्थींना रोख रक्कमसन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणालेग्रंथालयांना आर्थिक सहाय्य योग्य पद्धतीने मिळणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जर नवीन पिढी ग्रंथालयाकडे जात नसेल तर नवनवीन प्रयोग करून त्यांच्यापर्यंत ग्रंथालय आणणे गरजेचे आहे.  फिरते वाचनालयई वाचनालय अशा विविध पद्धतीने लोकांपर्यंत वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथालय संचालनालय काम करीत आहे. सर्वांनी मिळून ग्रंथालय, वाचनालयाचा आत्मा समजून घेऊन ग्रंथालयाची चळवळ विकसित करण्याची गरज आहे.

            प्रधान सचिव श्री. रस्तोगी म्हणाले कीमहाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ खूप मोठी आहे. ही चळवळ बळकट होऊन वाचकांना अधिक चांगली सेवा चळवळी मार्फत देण्यात यावी. ग्रंथालयाच्या आस्थापनांनी ग्रंथालयाचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. यातही आधुनिक तंत्रज्ञाननवीन पिढीची आवड ओळखून काम करावे. पुस्तके सहज उपलब्ध होण्यासाठी  डिजिटल तसेच ई-लायब्ररी करण्याकडे अधिक  भर देण्यात यावा. ग्रंथालयातील पुस्तकेसोयीसुविधा आणि परिसर यात सुधारणा कराव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले.

(अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार

शहरी विभाग

१)  हिंद नगर वाचनालय व ग्रंथालयरहिमतपूर ता. कोरेगावजि. सातारा ( पुरस्काराची रक्कम रु. १ लाख)

२) विवेकानंद सार्वजनिक वाचनालयनांदुराश्री. शिवाजी महाराज पुतळ्याजवळबुलढाणा रोडनांदुरा जि. बुलढाणा (पुरस्काराची रक्कम रु. ७५ हजार)

*ग्रामीण विभाग* :

(अ)  १) शहीद भगतसिंग वाचनालयकुऱ्हामु.पो. कुऱ्हा ता. तिवसा जि. अमरावती (पुरस्काराची रक्कम १ लाख रु.)

(आ)     संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयभिडी ता. देवळी, जि. वर्धा (७५ हजार रु.)

(इ)       कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयबोरीता. जिंतूर जि. परभणी (५० हजार रुपये)

(ई)       कै. रघुनाथ रामचंद्र बुरांडे ग्रंथालयबिरोबा मंदिराजवळकोडोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर (२५ हजार रु.)

(ब) डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) पुरस्कार (पुरस्काराची रक्कम रु. ५० हजार प्रत्येकी)

राज्यस्तरीय पुरस्कार

१) राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)

श्री. विनायक दत्तात्रय गोखलेअनंत आनंद को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीआनंद पार्कठाणे (प) मराठी ग्रंथसंग्रहालयठाणे

२) राज्यस्तरीय ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)

श्री. सुरेश बळिराम जोशीग्रंथपालविजय वाचनालयता. तुळजापूर जि. धाराशिव

 

डॉ. एस.आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार (पुरस्काराची रक्कम  रु. २५ हजार प्रत्येकी) :

१) अमरावती -  विनोद बाळकृष्ण मुंदेश्री. सरस्वती सार्वजनिक वाचनालयराजना पो. काजना ता. नांदगाव खंडेजि. अमरावती

२) छत्रपती संभाजीनगर -  युवराज मोहनराव जाधवलोकमान्य सार्वजनिक वाचनालयशिवणी (खुर्द)पो. शिवणी (बु.). ता.जि. लातूर

३) नागपूर -  धनराज देवीलाल रहांगडालेश्री. शारदा वाचनालयगोंदिया जि. गोंदिया

४) नाशिक -  गोपीचंद जगन्नाथ पगारेमातृभूमी प्रबोधन समिती संचलित महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयजेल रोडनाशिक जि. नाशिक

५) पुणे - ज्योत्स्ना चंद्रशेखर कोल्हटकरश्री छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयभवानी पेठसातारा जि. सातारा

६) मुंबई - अनंत आपाजी वैद्यरा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालयकुडाळजि. सिंधुदुर्ग

डॉ. एस. आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार (पुरस्काराची रक्कम  रु. २५ हजार प्रत्येकी) :

१) अमरावती - ज्योती रामदास सरदार (धबाले)ग्रंथपालसानेगुरुजी वाचनालयजठार पेठअकोलाजि. अकोला

२) छत्रपती संभाजीनगर - गणेश रामभाऊ शेंडगेग्रंथपालए. एच. वाडिया सार्वजनिक वाचनालयता. जि. बीड

३) नागपूर - नंदू दामोदर बनसोडग्रंथपालदादासाहेब निकम सार्वजनिक वाचनालयमहालता.जि. नागपूर

४) नाशिक -  अमोल संभाजी इथापेग्रंथपाल, अहमदनगर जिल्हा वाचनालयचितळे रोडअहमदनगर जि. अहमदनगर

५) पुणे - भगवान पांडुरंग शेवडेग्रंथपाल, श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालयमांगलेता.शिराळाजि. सांगली

६) मुंबई - मंजिरी अनिल वैद्यग्रंथपालश्रीधर वासुदेव फाटक ग्रंथसंग्रहालयविलेपार्ले (पूर्व) मुंबई.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

 

 


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi