Thursday, 25 July 2024

रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांत २६ जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

 रायगडरत्नागिरीसातारा या जिल्ह्यांत २६ जुलै रोजी

मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

 

            मुंबईदि.२५ : भारतीय हवामान विभागाकडून  २५ जुलै २०२४  रोजी प्राप्त झालेल्या सूचनेनुसारराज्यातील पालघरठाणेमुंबईरायगड,पुणेसातारा या जिल्ह्यात  रेड अलर्टचा इशारा दिला असून या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. रायगडरत्नागिरीसातारा या जिल्ह्यांना २६ जुलै २०२४ रोजी देखील रेड अलर्ट दर्शविला असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे.

            मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हा प्रशासनाला याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून त्या जिल्ह्यातील नागरिकांना मोबाईलवर सचेत ॲपद्वारे सतर्क राहण्याचा संदेश देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे. नदीनाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये.पर्यटनस्थळी धबधबेधरण परिसरघाटमाथा इ. ठिकाणी जाण्याचे टाळावे.

            वीज चमकत असताना झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच अतिवृष्टी दरम्यान जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नये. आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. राज्याचे सर्व विभाग/ क्षेत्रीय यंत्रणां/आपत्ती प्रतिसाद दलांना राज्य शासनामार्फत आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत.आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा आपत्कालीन प्रतिसाद केंद्र क्र. १०७७ व राज्य आपत्कालीन प्रतिसाद केंद्र क्र. ०२२-२२०२७९९००२२-२२७९४२२९  यावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi