Thursday, 25 July 2024

फिरत्या दवाखाना पथकात वापरलेली ४० वाहने खासगी कंपनीची या वाहनांचा शासनाशी काहीही संबंध नाही

 फिरत्या दवाखाना पथकात वापरलेली ४० वाहने खासगी कंपनीची

या वाहनांचा शासनाशी काहीही संबंध नाही

 

          मुंबईदि. २५ : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एका खासगी जागेत वर्षभरापासून उभी असलेली फिरत्या दवाखाना पथकातील सेवेसाठी वापरलेली ४० वाहने ही खासगी कंपनीच्या मालकीची आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्याच्या २० जिल्ह्यांतील दुर्गम भागांमध्ये आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मे. आर. डब्ल्यू. प्रमोशन्स प्रा. लि. या मुंबईतील कंपनीशी आरोग्य विभागाने काही कालावधीसाठी करार केला होता. हा करार २० जुलै २०२३ रोजी संपुष्टात आला असूनही सर्व वाहने ही या खासगी कंपनीच्या मालकीची आहेतअसा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे.

          राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानांतर्गत राज्यातील निवडक जिल्ह्यांसाठी व काही प्रवण क्षेत्रासाठी दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्‍ये ज्‍या ठिकाणी आरोग्‍याच्‍या सेवांपासून लोक वंचित राहतातअशा गरजू लोकांना आरोग्‍याच्‍या सेवा देण्‍यासाठी काही कालावधीसाठी केंद्र शासनामार्फत २० फिरते दवाखाने (मोबाईल मेडिकल युनिट) मंजूर होते. मे. आर. डब्ल्यू. प्रमोशन्‍सप्रा.लि.मुंबई या सेवा पुरवठादारासोबत २० जिल्ह्यांमध्‍ये फिरता दवाखाना प्रकल्‍प चालविण्‍यासाठी आरोग्य विभागाचा करार झाला होता. गेल्या एक वर्षापूर्वीच २० जुलै २०२३ रोजी हा करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे मे. आर. डब्ल्यू. प्रमोशन्‍सप्रा. लि.मुंबई संस्‍थेचे कंत्राट संपुष्‍टात आलेले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात एका खासगी जागेवर उभी असलेली ४० वाहने ही खासगी कंपनीच्या मालकीची आहेत. त्यामुळे या वाहनांचा शासनाशी काहीही संबंध नाही.

          सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आदिवासी भागातील जनतेला विविध प्रकारच्या उपक्रमांद्वारे आरोग्य सेवा देण्यात येत आहे. सद्य:स्थितीत राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानांतर्गत राज्यातील आदिवासी भागातील जिल्ह्यांमध्ये जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी एकूण 85 मोबाईल मेडिकल युनिट जिल्‍हा आरोग्य सोसायटीकडून जिल्हास्तरावर सुरू आहेत. या मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्पाद्वारे जानेवारी २०२४ पासून ३,६८,९०७ रुग्‍णांना आतापर्यंत सेवा देण्‍यात आलेली आहेअसेही आरोग्य विभागाने दिलेल्या खुलाशात नमूद आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi