Tuesday, 2 July 2024

नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत, अधिसंख्य कर्मचाऱ्यांना वारसा हक्क सोडून सर्व लाभ

 नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत,

अधिसंख्य कर्मचाऱ्यांना वारसा हक्क सोडून सर्व लाभ

            मुंबईदि. १ : नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत अधिसंख्य कर्मचा-यांना वारसा हक्क सोडूनलाड-पागे समितीने केलेल्या शिफारशीनुसारइतर सर्व लाभ देण्यात येत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            सदस्य अभिजित वंजारी यांनी नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत अधिसंख्य कर्मचाऱ्यांविषयी उपस्थिती केलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

            मंत्री श्री.सामंत म्हणाले की, राज्य शासनाद्वारे दि. २० सप्टेंबर २०१९ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये नागपूर महानगरपालिकेतील ४४०७ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदे निर्माण करून समावेशन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागात कार्यरत ज्या कर्मचाऱ्यांची सेवा २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे, अशा एकूण ३८०५ पात्र ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर सद्यस्थितीत समावून घेण्यात आले आहे. उर्वरित ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना पात्र झाल्यानंतर अधिसंख्य पदावर सामावून घेण्याची प्रक्रिया महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

            मंत्री श्री.सामंत म्हणाले की, नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत अधिसंख्य कर्मचा-यांना देण्यात येत असलेल्या लाभात  वेतन भत्तेआठवडा सुट्टीवैद्यकीय रजावैद्यकीय सुविधानिवासस्थान व सेवानिवृती वेतन योजना इत्यादींचा समावेश आहे. अधिसंख्य पदावर कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना लागू असणारे परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनाकुटुंब निवृत्तिवेतनमृत्यु उपदानरुग्णता निवृत्तिवेतनसेवानिवृत्ति उपदान इ. लाभ अनुज्ञेय आहेततसेच रजेचे रोखीकरणगटविमा योजना इ. लाभ अनुज्ञेय आहेत.

            शासन निर्णय दि. २० सप्टेंबर २०१९ नुसार केवळ कार्यरत ऐवजदार कर्मचाऱ्यांना नियमित करण्याकरिता अधिसंख्य पदे निर्माण झाली असल्यानेही अधिसंख्य पदेकोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास ती त्या दिनांकापासून आपोआप व्यपगत होत असल्यानेऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना नियुक्ती देण्यात्ताठी कोणतेही अधिसंख्य पद निर्माण करण्यात येणार नाही अथवा व्यपगत झालेले पद पुनर्जिवित करता येत नाही. यामुळे ज्या ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर समावून घेण्यात आले आहेत्यांच्या वारसांना नियुक्ती देणे शक्य होत नाही. या अटीशिवाय लाड - पागे समितीच्या इतर सर्व शिफारशी व लाभ पात्र ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेद्वारे देण्यात येतात असेही त्यांनी सांगितले.

            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगतापविजय गिरकर, प्रवीण दटके यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi