सातारा जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र वाढवण्यासाठी सरकार सकारात्मक
- मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. १ : सातारा जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र वाढवून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना ते बोलत होते.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात आयटी सेक्टर किंवा एमआयडीसीचा विस्तार व्हावा यासाठी शासन सकारात्मक विचार करीत आहे. सातारा एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र स्कूटर ही कंपनी अनेक वर्षापासून बंद आहे ही जागा शासनाकडे घेण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार करून त्यावर निर्णय घेण्यात येईल. सातारा जिल्ह्यातील युवक रोजगारासाठी बाहेर जावू नये यासाठी विविध उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment