Thursday, 13 June 2024

फळ पीक विमा योजनेत संबंधित शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

 फळ पीक विमा योजनेत

संबंधित शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

- कृषिमंत्री धनंजय मुंडे

मृग व आंबिया बहारातील फळांचा विमा भरण्यास सुरुवात

            मुंबई, दि. 12 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षात राबवण्यासंदर्भात राज्य शासनाने मान्यता दिली असून मृग बहार व आंबिया बहारातील ठराविक फळ पिकांचा विमा शेतकऱ्यांनी भरून या योजनेत सहभागी व्हावेअसे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

            या हंगामात राज्यात डाळिंबसंत्रामोसंबीचिकूपेरूलिंबूसीताफळद्राक्षआंबापपईकाजूस्ट्रॉबेरी व द्राक्ष क इत्यादी पिकांचा फळपीक विमा योजनेत सहभाग करण्यात आला आहे. ही योजना भारतीय कृषी विमा कंपनीबजाज अलियांजफ्युचर जनरल आणि युनिव्हर्सल सोम्पो या चार कंपन्यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे.

            मृग बहरात द्राक्ष कसंत्रापेरूलिंबू या चार पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 25 जून निश्चित करण्यात आली आहेत्याचबरोबर मोसंबी चिकू 30 जूनडाळिंब 14 जुलै तर सीताफळ पिकासाठी 31 जुलै ही मुदत देण्यात आली आहे.

            दरम्यान 2024 ते 26 या दोन वर्षात राबविण्यात येणाऱ्या फळपिक विमा योजनेचे स्वरूपविमा संरक्षित रक्कम यांसह सविस्तर माहिती कृषी विभागाकडून जारी करण्यात आली असूनफळ उत्पादक शेतकऱ्यांनी विहित मुदतीत आपला विमा भरून घ्यावाअसे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi