Thursday, 13 June 2024

सामाजिक मूल्यांची बांधिलकी जपणारे, मुलांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असे राज्य बाल धोरण असावे

 सामाजिक मूल्यांची बांधिलकी जपणारे,

मुलांच्या सर्वांगीण विकासाला

पोषक असे राज्य बाल धोरण असावे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या सूचना

 

            मुंबईदि. १२ : महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ चा मसुदा तयार केलेला आहे. राज्य बाल धोरण व कृती आराखडा संदर्भात 30 जून 2024 पर्यंत हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सामाजिक मूल्यांची बांधिलकी जपणारे आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असे राज्य बाल धोरण असावे अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केल्या.

            महिला व बाल विकास मंत्री कु. तटकरे यांनी आज मंत्रालायत प्रस्तावित राज्य बाल हक्क धोरण संदर्भात आढावा घेतला. यावेळी महिला बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादवमहिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरेएकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे बाल हक्क आयोगाचे सदस्य सचिव भालचंद्र चव्हाण संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मुलांच्या वाढीसाठी आणि कल्याणासाठी नैसर्गिक वातावरण महत्वाचे असते त्यासाठी आवश्यक संरक्षण आणि सहाय्य राहील असे सर्वसमावेशक राज्य बाल धोरण असावे. तसेच लहान वयात सोशल मीडियाचा वापर, यावर सायबर सुरक्षेच्या दृष्टीने काही तरी निर्बंध घालता येतील का याचा ही विचार करावा.

            यामध्ये मुलींची सुरक्षितताआरोग्य तपासणी महत्वाची असून शाळेतील रिपोर्ट कार्ड वर सुद्धा मुलांच्या उपक्रमांचा विशेष उल्लेख करता येईल का यावर ही विचार करून सर्व बाजूंनी अभ्यास करून सर्वसमावेशक असे बाल धोरण तयार करावे, असेही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi