"मौल्यवान झाडे विनामूल्य" भारतीय जलसंसाधन संस्थेचा उपक्रम
भारतीय जलसंसाधन संस्था, ज्ञानदीप नागपूर व निसर्ग विज्ञान यांचे संयुक्त
विद्यमाने बुधवार दिनांक 5 जूनला पर्यावरण दिनी "मौल्यवान झाडे
विनामूल्य" वाटप करण्याचा कार्यक्रम ठरविण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमात नागपुरातील नागरिकांना मौल्यवान झाडे विनामूल्य देण्यात
येणार आहे. अन्न, वस्त्र, निवारासह सर्व गरजा पूर्ण करणारी ही झाडे
आपल्याला शुद्ध हवा देतात. ऑक्सीजन पुरवून हवेची गुणवत्ता सुधारतात.
हवामानाचे संतुलन ठेवतात. पाणी साठवून ठेवण्यासाठी झाडे महत्वपूर्ण कार्
करतात. मातीचे रक्षण करणे, वन्य जीवांना आधार देणे, अशी पर्यावरणाची
अनेक कामे करणारी ही झाडे संस्थेतर्फे वाटप करण्यात येणार असून यात,
कडुलिंब, शिसव, करंज, जारूळ, तबेबुइया इत्यादि झाडे असणार आहे. ही झाडे
जवळपास चार फूट उंच असतील.
या झाडाला नागरिकांनी आपल्या घरी, आपल्या आवारात लावावे व त्याची
जोपासना करावी या माफक अपेक्षेने मूल्यवान झाडे विनामूल्य वाटप कार्यक्रम
होणार आहे.
हा कार्यक्रम धरमपेठमध्ये लक्ष्मी भुवन चौकातील फळ विक्रेत्यांच्या
समोरील जागेत होणार असून, बुधवार दिनांक 5 जून सकाळी 9.30 वाजता पासून
11.30 वाजेपर्यंत ही झाडे वाटप केल्या जातील. सर्व नागरिकांनी, शाळांनी,
समाजसेवी संस्थांनी या ठिकाणी येऊन झाडे घेऊन जावी. झाडे सामुहिक
लावणा-यांनी आपली मागणी नोंदवून, आपण जेव्हा झाडे लावणार त्यावेळेस झाडे
उपलब्ध करून देण्यात येईल. असे आव्हान भारतीय जलसंसाधन संस्थेचे अध्यक्ष
डॉ. प्रवीण महाजन, इंजि राजेश ढोमणे, इंजि रविकांत पैठणकर. ज्ञानदीप
तर्फे प्रभाकर वर्धने, डॉ. राजीव मारावार, सौ. वृंदा महाजन, सौ. रसिका
जगदाळे, प्रतीक महाजन. निसर्ग विज्ञान तर्फे डॉ. विजय घुगे मुन्ना महाजन,
भगवानदास राठी व तिन्ही संस्थेच्या कार्यकारणी सदस्यांनी केलेले आहे.
No comments:
Post a Comment