Saturday, 29 June 2024

कालिना संकुलातील मुलींच्या वसतिगृहातील कृती अहवाल तत्काळ सादर करावा

 कालिना संकुलातील मुलींच्या वसतिगृहातील

कृती अहवाल तत्काळ सादर करावा

-उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

            मुंबई दि. २८ : महाराष्ट्र विधानपरिषद सभागृहात मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील मुलोच्या वसतिगृहातील विद्यार्थिनोंना विषबाधा झाल्याबद्दल तसेच यातील मूलभूत सुविधा खालावल्याचा तारांकित प्रश्न विलास पोतनीस यांनी उपस्थित केला. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी हो घटना घडल्यानंतर संकुलास भेट दिली. त्यावेळी तिथे मुलींना पिण्यासाठी असलेल्या पाण्याचे मशिनची साफसफाई केलेली नव्हती. तसेच वसतिगृहात असणाऱ्या घाणीमुळे मोठ्या प्रमाणात डास होते. त्यामुळे बऱ्याच मुली या आजारी पडलेल्या होत्या. वसतिगृहात टँकरने पाणी पुरविले जाते. हा टँकर जंतू संसर्ग असल्याचे समजले. त्या पार्श्वभूमीवर वसतिगृहातील मुलींच्या तक्रारी ऐकणे व निवारण करण्यासाठी सुविधा तयार करावी. तसेच या ठिकाणी मुलींची जेवणाची व्यवस्था नसल्याने त्यांचेसाठी मेस किंवा कॅन्टीन ची व्यवस्था करावी. या मूलभूत सुविधांच्या त्रुटीची चौकशी करणेबाबत सभागृहातील सदस्यांची समिती गठित करणेबाचत संबंधित विभागाने प्रस्ताव द्यावा. तसेच या ठिकाणी असणाऱ्या गैरसोयी व त्रुटीबाबत उच्चस्तरिय अधिकाऱ्यांमार्फत कृती अहवाल सादर करावा. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत कृती अहवाल सादर करण्यात यावा अशी ही सूचना यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

            यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सभागृहात उपस्थित होते. त्यांनी याबाबत शासन सकारात्मक कार्यवाही करेल असे सांगितलेआमदार अनिल परबआमदार सचिन अहिर व आमदार मनीषा कायंदे यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi