बीड विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांनी
ईडीसी प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून प्राप्त करावे
बीड, दि.7 (जीमाका) : मतदानापासून आपले कर्मचारी अधिकारी वंचित राहू नये, यासाठी बीड लोकसभा मतदार संघाअंतर्गत बीड विधानसभा मतदारसंघातील अधिकारी/ कर्मचारी यांनी बीड तहसील कार्यालयातून निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी कविता जाधव यांनी कळविले आहे.
बीड विधानसभा मतदार संघांतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी ज्यांनी प्रथम प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे केले आहे त्या ठिकाणी त्यांनी 12 (अ) अर्ज भरून दिलेले होते. अशा सर्व निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी कर्मचारी यांचे निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्रचे वाटप तहसील कार्यालय बीड येथील पहिल्या मजल्यावर सुरू असून दि. 11 मे 2024 तारखेपर्यंत ईडीसी प्रमाणपत्र करुन घ्यावे, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment