Friday, 8 March 2024

ग्रामीण लघुउद्योजकांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्धतेसाठी राज्यस्तरीय प्रदर्शनास सुरुवात

 ग्रामीण लघुउद्योजकांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्धतेसाठी

राज्यस्तरीय प्रदर्शनास सुरुवात

-   सभापती रविंद्र साठे

 

            मुंबईदि. ७ : ग्रामीण लघुउद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने ८ मार्च ते १७ मार्च या कालावधीत सी.बी.कोरा केंद्रशिंपोली गावबोरीवली येथे राज्यस्तरीय वस्तू प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावाअसे आवाहन राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांनी केले आहे.

            प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ग्रामीण लघु उद्योजकांच्या वस्तूंची विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे सभापती श्री. साठे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आज खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

            या प्रदर्शनामध्ये खादी ग्रामोद्योग आयोग व राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या ग्रामीण उद्योजकांच्या दर्जेदार उत्पादनांचा समावेश केला आहे. तसेच मध केंद्र योजना व मधाचे गाव यासह मधाच्या विक्रीसाठी इच्छुक लघुउद्योजकांना प्रदर्शनामध्ये माहिती देण्यात येणार आहे.

            खादी ग्रामोद्योग मंडळ व खादी ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने ग्रामीण भागात शासनाच्या रोजगार निर्मितीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. ग्रामीण उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तुंना/उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मंडळ कार्यरत आहे. खादी सामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी जनजागृती मेळाचे सर्व जिल्ह्यात आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            या प्रदर्शनामध्ये ५० स्टॉल लावण्यात येणार असूनसकाळी १०.०० ते रात्री १०.०० या वेळेत खुले राहील. प्रदर्शनामध्ये खादीवस्त्रहळदमधहातकागद उत्पादनेकोल्हापूरी चप्पलकेळीपासून विविध पदार्थमसालेविविध प्रकाची लोणचीपापडलाकडी खेळणीशोभेच्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती श्री.साठे यांनी दिली.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागिरांना

कौशल्य प्रशिक्षणासमवेत आर्थिक लाभ देणार

मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला

            विविध १८ लघु व्यवसायातील कारागिर आणि शिल्पकारांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत १५ हजारापर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यांना पाच दिवसांचे कौशल्य प्रशिक्षण आणि भांडवल खरेदीसाठी तीन लाखापर्यंत टप्प्याटप्याने कर्ज प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी दिली.

            लहान कामगार आणि कुशल कारागिरांना प्रशिक्षणकौशल्याबाबत सल्ला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान देण्यात येणार आहे. देशातील गरजू कारागिरांना सक्षम बनविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारातून ही योजना राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले. नोंदणीकृत कारागिरांना मान्यता देण्यात येणार आहे. आजतागायत ३ लाख कारागिरांची नोंदणी झाली असून१४ हजार कारागिरांना १०० प्रशिक्षण केंद्रामध्ये  कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

            या प्रदर्शनाची सुरुवात जागतिक महिला दिनानिमित्त होत असल्याने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ५० कारागिर महिलांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या विविध योजनांची माहिती या मेळाव्यात देण्यात येणार आहे.

            या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन ग्रामोद्योगी उत्पादने खरेदी करावी आणि ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहित करावे असे आवाहन मंडळाचे सभापती रवींद्र साठे व मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी केले आहे. या प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी ०२२/२२६१७६४१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi