Friday, 22 March 2024

विभागीय हातमाग कापड स्पर्धा सन २०२३-२४" चा निकाल जाहीर

 "विभागीय हातमाग कापड स्पर्धा सन २०२३-२४" चा निकाल जाहीर

 

            मुंबईदि. २१ : राज्यातील हातमाग सहकारी संस्थामहामंडळखाजगी व इतर सर्व क्षेत्रातील हातमाग विणकरांनी हातमागावर तयार केलेल्या कापडांच्या उत्कृष्ट नमुन्यासाठी प्रादेशिक उपायुक्त  वस्त्रोद्योग विभागामार्फत विभागीय हातमाग कापड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा सन २०२३ – २४ चा निकाल जाहीर झाला आहे.

            श्रीमती प्रणिता पैठणी रमेशसिंग परदेशी यांनी तयार केलेली पैठणी साडीश्रीमती आशा संतोष भरते यांनी तयार केलेली पैठणी साडी यांना प्रथम क्रमांकाचे 25 हजार रुपयांचे पारितोषिक विभागून देण्यात आले.

            श्री सुदेश उद्धव नागपूरे यांनी तयार केलेला वॉल पीस आणि मनोज गिरजीनाथ दिवटे यांनी तयार केलेली पैठणी साडी  यांना द्वितीय क्रमांकाचे २० हजार रुपयांचे पारितोषिक विभागून देण्यात आले.

            श्रीमती सुरेखा सचिन करंजकर यांनी तयार केलेला वॉलपीस आणि सागर विजय खेरुड यांनी तयार केलेली पैठणी साडी यांनी अनुक्रमे तृतीय क्रमांक प्राप्त केला. या दोघांना २० हजार रुपयांचे पारितोषिक विभागून देण्यात आले.

            कोकण विभागीय आयुक्त (महसुल) डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते विजेत्यांना पुष्प गुच्छ व प्रशस्तीपत्र देण्यात आले आणि सहभागी विणकरांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र देण्यात आले.

            हातमाग कापड स्पर्धा व बक्षीस या स्पर्धेत राज्यातील हातमाग सहकारी संस्थामहामंडळखाजगी व इतर सर्व क्षेत्रातील हातमाग विणकरांनी हातमागावर तयार केलेल्या कापडाच्या उत्कृष्ट नमुन्यास बक्षीस देण्यासाठी विभागीय हातमाग कापड स्पर्धा ही विभागीय स्तरावरप्रादेशिक उपआयुक्तवस्त्रोद्योगनागपूरसोलापूरछत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) व मुंबई ह्या ४ ठिकाणी त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांसाठी आयोजित करण्यात येत आहे.  

            कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने गुणांकन करून प्रथमद्वितीय आणि तृतीय क्रमांकाची निवड केली. भोरुका चॅरीटेबल टेस्टट्रान्सपोर्ट हाऊस५ वा मजला१२८-बपुना स्ट्रीट्रमस्जीद (पूर्व) ४०० ००९ येथे  आयोजित केली होती.

            या स्पर्धेत एकूण २६ नमुने प्राप्त झाले होते. गठीत विभागीय निवड समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी सदर व अपरंपरागत उत्पादीत वाणांचे निवड समितीने प्रत्येक नमुन्याची पाहणी केली. पाहणी करतांना उत्पादीत वाणाची आकर्षक रंगसंगतीउत्पादीत वाणामधील नक्षीकामउत्पादीत वाणामधील नक्षीकामाची अखंडता (Continuous Design), नियमित वाणामध्ये नाविण्यपूर्ण प्रयत्न, वाणाचा पोत,उत्पादीत वाण तयार करण्यास लागलेला कालावधीवाणाचा तलमपणा (Texture), इत्यादी बाबींचा विचार करून प्रदर्शित नमुन्यांपैकी या नमुन्याची निरीक्षण व पाहणी करून त्यांना गुण देऊन त्याच्या मधील समितीने निर्णय प्रथमद्वितीय व तृतीय बक्षीस विभागून देण्याचे निश्चित केले.

******

संध्या गरवारे/विसंअ/


 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi