*।। जल देवताभ्यो नम: ।।*
*२२ मार्च - दिन विशेष - जागतिक जल दिन, शुक्र प्रदोष.*
*पाणी हे जीवन आहे.*
*आपल्या शरीरातील अर्ध्याहून अधिक वजन हे पाण्याचे आहे यावरून आपल्या जीवनात पाण्याचे महत्त्व किती आहे याचा अंदाज लावता येतो. केवळ मानवच नाही तर जगातील कोणताही प्राणी किंवा वनस्पती पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाण्याचे आपल्या जीवनात खूप जास्त महत्व आहे. आपल्याला आंघोळ, पूजा, स्वयंपाक, साफसफाई, कपडे धुणे अशा अनेक कामांसाठी पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पाण्याचे हे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी २२ मार्च रोजी जगभरात जागतिक जल दिन साजरा केला जातो.*
*जागतिक जल दिन का? संयुक्त राष्ट्रसंघाच्या { युनो } सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला जागतिक जल दिन अर्थात 'वर्ल्ड वॉटर डे' साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी २२ मार्च रोजी संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक जल दिन साजरा करत आहे.*
*शांततेसाठी पाण्याचा वापर जागतिक जल दिनानिमित्त दरवर्षी वेगळी संकल्पना 'युनो' वापरते. ती प्रथाच झाली आहे. यावर्षी अर्थात जागतिक जल दिन-२०२४ मध्ये 'शांततेसाठी पाण्याचा वापर' अशी संकल्पना आहे*
*गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति । नर्मदे सिन्धु कावेरी जलऽस्मिन्सन्निधिं कुरु ।।*
*आजचा राहुकाळ - सकाळी :- १०.३० ते १२.०० वाजे पर्यंत.*
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
*ll श्री स्वामी समर्थ ll शुभ प्रभात ll*
*हे ईश्वरा ! सर्व जीवसृष्टी सुखी राहो ! सर्वांचे जीवन रोगमुक्त राहो ! आम्हा सर्वांना कुशलता दे ! सर्व दुःखमुक्त राहोत ! हे ईश्वरा ! सर्वत्र शान्ति असु दे !*
No comments:
Post a Comment