Wednesday, 6 March 2024

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांच्यात सामंजस्य करार

 मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांच्यात सामंजस्य करार

 

        मुंबईदि. 5 : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन व भारतीय तंत्रज्ञान संस्थामुंबई (IIT) यांच्या दरम्यान राज्यात ड्रोन मिशन राबविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला.

            यावेळी आमदार विक्रम काळे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, संशोधन व विकास,आय.आय.टी चे अधिष्ठाता प्रा.सचिन पटवर्धन आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रस्तोगी यांनी तर आयआयटीमुंबईच्या वतीने प्रा. पटवर्धन यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

            राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाची उपयुक्तता व वाढता वापर करण्याकरिता राज्यात अत्याधुनिक ज्ञानावर आधारित ड्रोन मिशनची आखणीप्रभावी अंमलबजावणी व सर्वसमावेशक यंत्रणा तयार करण्यासाठी मिशन ड्रोन राबवण्यात येणार आहे. या मिशनच्या प्रकल्पांतर्गत 5 वर्षासाठी 23 हजार 863.43 लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तर आयआयटीमुंबई यांना 15 हजार 181.71 लक्ष निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

            ड्रोनच्या वापरामुळे शेतामध्ये पीक पहाणी व फवारणी कमी वेळात व कमी किंमतीत होऊ शकणार आहे. दुर्गम भागामध्ये औषधेलसींचे तसेच सर्पदंश व श्वानदंश लसींचे वितरण करणेदुर्घटनेच्या ठिकाणी तातडीने व्हीडिओ कॅमेरा व ध्वनिक्षेपन यंत्रणा उपलब्ध करणेदुष्काळप्रवण क्षेत्राची पहाणी व सनिंत्रण करणेपुरग्रस्त क्षेत्राचा अंदाज घेणेजंगलातील वणवा नियंत्रण करणेजमीन वापराचे व वन क्षेत्र निश्चित करणेपूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहचवणेसिंचनक्षेत्र निश्चित करणेजलसाठ्यांचे संवर्धनजमिनीची धूपदरड कोसळणे याबाबत उपाययोजनाबांधकाम क्षेत्रामध्ये कामाच्या प्रगतीची काटेकोर मोजमाप करणेकायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणीवाहतुक व्यवस्थापन याक्षेत्रांमध्ये प्रभावी व सोप्यापद्धतीने काम करता येणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi