Friday, 1 March 2024

समर्पण” उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 मार्च रोजी शुभारंभ महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व महाप्रित यांचा हा उपक्रम

 समर्पण उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 मार्च रोजी शुभारंभ

 

            मुंबई‍‍दि. 29 : महाप्रित स्टार्टअप नॉलेज सेंटरच्या समर्पण या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ दि. 1 मार्च रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  होणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व महाप्रित यांचा हा उपक्रम आहे.

            महाप्रित स्टार्टअप नॉलेज सेंटरच्या माध्यमातून उद्योजकांच्या सामाजिक दायित्व निधीतून (CSR) हा उपक्रम (समर्पण) राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे राज्याच्या सर्वांगीण ग्रामीण विकासास चालना मिळणार असल्याबाबत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

      समर्पण उपक्रमातून कौशल्यसंशोधन व संसाधने हे मुख्य उद्देश साध्य करण्यात येणार असून यासाठी सामाजिक दायित्व अंतर्गत विविध उद्योगसंस्था यांचा हातभार लागणार आहे. समाजातील महिला सक्षमीकरणशिक्षणविविध दुर्बल घटकांसाठी रोजगार यावर प्रभावी मार्ग यामधून निघणार आहे.

            महाप्रितद्वारे सौर उर्जा प्रकल्पासह नविनीकरणीय उर्जाइलेक्ट्रीक वाहन (EV) चार्जिंग स्टेशनकृषी प्रक्रिया मुल्य साखळी आणि जैव इंधन (Biofuels) आरएमसी प्लांटपरवडणारी घरे तसेच केंद्र शासनाच्या गृहनिर्माण प्रकल्पमहामार्ग रस्ते प्रकल्पपर्यावरण आणि हवामान बदलासाठी उर्जा लेखापरिक्षण योजनानवीन आणि उद्योन्मुख उर्जा तंत्रज्ञान प्रकल्पविशेषत: ग्रीन हायड्रोजनभविष्यातील उर्जा एकत्रिकरण प्रकल्पसॉफ्टवेअर तंत्रज्ञान आणि अनुप्रयोग आधारित सेवा इत्यादी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. महाप्रितमार्फत नवयुग योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होऊन समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी हातभार लागणार आहे.

      समर्पण उपक्रमाअंतर्गत साधारणत: 100 कोटींचा निधी उभारण्यात येऊन प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मुख्य समस्या ज्यामध्ये शेतीचे माती परीक्षणविविध यंत्रसामुग्रीची गरज या यांत्रिकी गरजा यातून साध्य करण्यात येणार असून शेतकऱ्यांना उत्तम प्रकारचे पिके घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

समर्पण उपक्रमातून राज्याच्या ग्रामीण विकास व रोजगार निर्मितीस चालना

            नुकतेच स्विर्त्झलँड मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परीषदेमध्ये अनेक महत्वकांक्षी पकल्पांसाठी साधारणत: 72 हजार कोटींचे सामंजस्य करार (MoU) महाप्रिततर्फे करण्यात आलेले असून या करारांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व विकासास चालना मिळणार आहे.

            महामंडळामार्फत सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडीया (STPI) च्या नागपूर सेंटर यांच्याशी महत्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) केला असून MAHA-EDGE (Entrepreneurship Development and Growth Employment) हा उपक्रम त्याअंतर्गत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. समर्पण उपक्रमातून खऱ्या  अर्थाने राज्याच्या ग्रामीण विकास व रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे.

******

शैलजा पाटील/विसंअ/


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi