Friday, 16 February 2024

एमटीडीसी’चा 'जबाबदार पर्यटन' उपक्रम 'स्कोच' पुरस्काराने सन्मानित

 ‘एमटीडीसी’चा 'जबाबदार पर्यटनउपक्रम

 'स्कोचपुरस्काराने सन्मानित

               मुंबईदि.१५:-पर्यटन स्थळांचा पर्यावरणीयसामाजिकसांस्कृतिक आणि आर्थिक समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत 'जबाबदार पर्यटन' हा उपक्रम राबविण्यात येतो. या  उपक्रमाची दखल घेऊन प्रतिष्ठित  स्कोच (SKOCH)च्या रौप्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

            नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे हा पुरस्कार सोहळा झाला. ‘एमटीडीसी’च्या अधिकारी मानसी कोठारे यांनी हा पुरस्कार स्विकारला. स्कोच (SKOCH) समूह हा 1997 पासून सर्वसमावेशक वाढीवर लक्ष केंद्रित करून सामाजिक-आर्थिक समस्या हाताळणारा भारतातील अग्रगण्य थिंक टँक आहे. हा समूह देशाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. विविध शासकीय संस्थाखाजगी संस्था यांच्याशी संलग्न आहे.

            पर्यटन मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन सचिव जयश्री भोज यांनी एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, एमटीडीसी अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी ‘एमटीडीसी’चे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल उपस्थित होते.

             'जबाबदार पर्यटनहा उपक्रम पर्यटन मंत्री श्री. महाजन यांच्या नेतृत्वाखालीपर्यटन सचिव श्रीमती भोज आणि एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकश्रीमती शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.  एमटीडीसीची ३० पर्यटन निवासे२९ उपहारगृहे२ बोट क्लब आणि २ अभ्यागत केंद्रेआय. आय. एस. डी. ए. (Indian institute of scuba diving and aquatic) स्कूबा डायव्हिंगसाठी ओळखली जाणारी आणि जलक्रीडांना समर्पित आय. आय. एस. डी. ए.अजिंठा वेरुळ अभ्यांगत केंद्रवॉटरपार्क या ठिकाणी या उपक्रमाची दखल राष्ट्रीयस्तरावर घेण्यात आली आहे.

            घारापुरी लेणी (एलिफंटा), खारघरटिटवाळाछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठाफर्दापूरअजिंठा टी पॉईटलोणारगणपतीपुळेतारकर्लीइसदावेळणेश्वरकुणकेश्वरहरिहरेश्वरमहाबळेश्वरकार्लापानशेतमाळशेज घाटमाथेरानभिमाशंकरकोयनानागपूरताडोबाबोधलकसावर्धासिल्लारीभंडारदराशिर्डीग्रेप पार्कबोट क्लब नाशिकचिखलदरा इ. ठिकाणी जबाबदार पर्यटन’ या उपक्रमांतर्गत ‘एमटीडीसीची’ पर्यटक निवासे आहेत.

            पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावीरोजगाराला चालना मिळावी यासाठी ‘एमटीडीसी’ सदैव प्रयत्न करत आहे.  उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करूनइतर कोणताही खर्च न करता एमटीडीसी हा उपक्रम यशस्वीपणे राबवित आहे. ‘जबाबदार पर्यटन’ अंतर्गत स्वच्छता मोहीमपर्यटकांसाठी माहितीपूर्ण फलककोणतेही संरक्षक किंवा कृत्रिम पदार्थ किंवा कृत्रिम रंग नसलेल्या आरोग्यदायी आहारावर लक्ष केंद्रित करणे आणि एमएसजी, प्लास्टिक चा वापर टाळणेवृक्षारोपण असे अनेक उपक्रम करत आहे. एमटीडीसीच्या ‘भूमिपुत्र’ धोरणाद्वारे रोजगार आणि पर्यटन प्रशिक्षण देण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी पर्यटन उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे.

            जबाबदार पर्यटन’ मध्ये शाश्वत संसाधन व्यवस्थापननैसर्गिक अधिवासांचे संवर्धनसांस्कृतिक वारशाचे जतन आणि समुदाय सहभाग यासारख्या पद्धतींचा समावेश आहे. ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम वन्यजीव सफारीला प्रोत्साहन देत पर्यावरणपूरक वाहतूक पर्यायांद्वारे कार्बन फुटप्रिंट कमी करण्यास मदत करत आहे. याव्यतिरिक्त स्थानिक समुदायांकडून वस्तू आणि सेवा मिळवून स्थानिक अर्थव्यवस्थांना बळकटी मिळत आहे.  पर्यटन स्थळांची सखोल माहिती देणेपर्यटकांमध्ये जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि भागधारकांसोबत सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

              ‘जबाबदार पर्यटन’ हा उपक्रम राज्यभर प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्नशील असून यामध्ये राज्याला अग्रस्थानी ठेवण्यासाठी  ‘एमटीडीसीचे महाव्यवस्थापक श्री. जयस्वाल प्रयत्नशील आहेत.

००००

संध्या गरवारे/विसंअ

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi