अर्थसंकल्पीय अधिवेशन 2024
विधानसभेमध्ये 8 हजार 609 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
मुंबई, दि. 26 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी एकूण आठ हजार 609.17 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.
पहिल्या दिवशी तीन विधेयके सादर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2024 मांडले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक 2024 आणि सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2024 मांडले.
No comments:
Post a Comment