अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या
कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मद
त
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जखमी वारकऱ्यांच्या उपचारांचा खर्चही राज्य शासन करणार
नागपूर, दि. १२ : नाशिक - पुणे महामार्गावर शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर शिरल्याने अपघात होऊन पायी चालणाऱ्या ४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदत देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. तसेच या घटनेत जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च राज्य शासन करेल, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभेत ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी हा विषय उपस्थित केला होता.
आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिक वारी सोहळ्यासाठी शिर्डीवरून आळंदीकडे येणाऱ्या दिंडीतील भाविकांना अपघात झाला होता. भरधाव कंटेनर दिंडीत शिरल्याने चार वारकरी मृत्युमुखी तर ८ वारकरी जखमी झाले होते. नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी परिसरात
हा अपघात घडला होता.0000
No comments:
Post a Comment