Friday, 1 December 2023

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यांतर्गत राज्य सल्लागार समितीची बैठक

 गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यांतर्गत

राज्य सल्लागार समितीची बैठक

 

            मुंबई, दि. ३० : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यांतर्गत राज्य सल्लागार समितीची बैठक  पुणे येथील सहसंचालक कार्यालयात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झाली. ही बैठक जे.जे. रुग्णालयाच्या प्रसूती व स्त्रीरोगशास्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास कुरुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

             या बैठकीस कुटुंब कल्याणमाताबाल संगोपन व शालेय आरोग्य पुणेआरोग्य सेवेच्या सह संचालक डॉ. बबिता कमलापूरकरआरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक राजश्री ढवळेविधी व न्याय विभागाच्या उपसचिव सुप्रिया धावरेसमिती सदस्य डॉ. पायल पाटील आदी उपस्थित होते.

                 डॉ. कमलापूरकर यांनी राज्यातील कामकाजाचा सविस्तर आढावा सादर केला. सर्व जिल्ह्यांमध्येमहानगरांमध्ये व तालुका स्तरावरही समिती स्थापन झाल्याची माहितीही डॉ. कमलापूरकर यांनी  दिली. तसेच राज्यात एकूण ११ हजार ५०२ सोनोग्राफी केंद्र असल्याचेही त्यांनी  सांगितले.

                प्रसुतीपूर्व लिंग निदान या बाबत नागरिकांना  १८००-२३३-४४७५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करता येते. या तक्रारीनंतर संबंधित केंद्रावर खटला दाखल झाल्यानंतर तक्रारदारास एक लाख रुपयाचे बक्षीस देणारी योजनाही सुरू आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi