कोकणचा विकास हाच आमचा ध्यास ;
विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हिंदुस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनी प्रकल्पाचे भूमिपूजन
रत्नागिरी, दि. 30 (जिमाका) : कोकण हे महाराष्ट्राचे वैभव आहे. कोकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
खेड लोटे एमआयडीसी येथे हिंदुस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनीच्या प्रकल्पाचे भूमिपुजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, एचसीसीबीचे सीईओ जुआन पॅब्लो रॉड्रिग्ज, माजी आमदार सदानंद चव्हाण, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, एचसीसीबीचे जनसंपर्क अधिकारी हिमांशु प्रियदर्शी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, पर्यावरणपूरक उद्योग आले पाहिजेत. रत्नागिरी जिल्हा आता उद्योग वाढीसाठी पुढे येत आहे. आताचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प आणण्यात यश मिळविले. महाराष्ट्रामध्ये उद्योग, व्यापार वाढण्यासाठी गती दिली आहे. अवघ्या महिनाभरात कोका कोलाला आवश्यक त्या परवानगी देण्यात आल्या, यालाच गतिमान सरकार म्हणतात. अशा उद्योगांसाठी महाराष्ट्र ‘रेड कार्पेट’ टाकून तयार आहे. या कंपनीत 2500 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. साठ उत्पादने या कंपनीतून उत्पादित होणार आहेत. स्थानिक लोकांना रोजगार देण्याची भूमिका शासनाची आहे, स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल. कोकाकोला प्रकल्प मोठा आहे. महाराष्ट्रात यापुढेही उद्योग येतील. कोकणाला विकासाकडे न्यायचे आहे. प्रगतीकडे न्यायचे आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आले पाहिजेत. गुंतवणुकीच्या पसंतीसाठी महाराष्ट्र हे प्रमुख राज्य आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यामुळे राज्यात विकास उद्योग वाढतो आहे. कोकणातील समुद्र किनारा समृद्ध आहे, यामुळे पर्यटन आणि उद्योग वाढीला चालना मिळेल. मुंबई - गोवा ग्रीन फिल्ड रस्ता तयार करतोय. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. त्यामतुळे त्यासाठी लवकरच कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उद्योगमंत्री श्री.सामंत म्हणाले की, कोका कोला प्रकल्पाला अल्पावधीत सर्व सुविधा या कंपनीला उपलब्ध करून दिल्या. एमआयडीसीच्या माध्यमातून आवश्यक त्या परवानग्या देण्यात आल्या. आज याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोका कोला कंपनीला 3 लाख 7 हजार चौरस मीटरची जमीन हस्तांतरण पावती देण्यात येणार आहे. येथील जमिनदारांचे काही प्रश्न होते. माजी मंत्री रामदास कदम व आपण आणि एमआयडीसीचे अधिकारी यांनी ग्रामस्थांचे प्रश्न सोडविले. प्रकल्प सुरू झाल्यावर 80 टक्के स्थानिकांना नोकऱ्या देण्याची मागणी आहे. या मागणीला प्राधान्य देणार आहोत, असेही उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले.
000
कोंकण का विकास हमारा जुनून;
विकास प्राधिकरण का शीघ्र क्रियान्वयन
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हिंदुस्तान कोका-कोला ब्रेवरीज कंपनी परियोजना का भूमिपूजन
रत्नागिरी, दि. 30 (जिमाका) : कोंकण महाराष्ट्र की शान है। कोंकण से मैं हृदय से प्यार करता हूं। कोंकण विकास प्राधिकरण शीघ्र ही क्रियान्वित होगा। कोंकण का विकास हमारा मुख्य ध्येय है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने विश्वास व्यक्त किया कि सरकार कोंकण में जो भी आवश्यक है उसे पूरा करेगी।
खेड़ लोटे एमआईडीसी में हिंदुस्तान कोका-कोला ब्रेवरीज कंपनी परियोजना का भूमि पूजन मुख्यमंत्री श्री शिंदे के हाथों संपन्न हुआ। उसी अवसर पर मुख्यमंत्री बोल रहे थे।
इस अवसर पर उद्योग मंत्री उदय सामंत, विधायक योगेश कदम, एचसीसीबी के सीईओ जुआन पाब्लो रोड्रिग्ज, पूर्व विधायक सदानंद चव्हाण, एमआईडीसी के सीईओ डॉ. बिपिन शर्मा, एचसीसीबी के जनसंपर्क पदाधिकारी हिमांशु प्रियदर्शी आदि उपस्थित थे।
मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि पर्यावरण अनुकूल उद्योग आने चाहिए। रत्नागिरी जिला अब औद्योगिक विकास के लिए आगे आ रहा है। वर्तमान उद्योग मंत्री उदय सामंत लगातार फॉलो-अप करते हुए से इस परियोजना को लाने में सफल रहे। महाराष्ट्र में उद्योग, व्यापार में वृद्धि बढ़ने को गति दी गयी है। केवल एक महीने में कोका-कोला को आवश्यक मंजूरी दे दी गयीं, इसे कहा जाता है गतिशील सरकार। महाराष्ट्र ऐसे उद्योगों के लिए 'रेड कार्पेट' बिछाने के लिए तैयार है। इस कंपनी में 2500 करोड़ रुपये का निवेश है। इस कंपनी से साठ उत्पाद बनाये जायेंगे। स्थानीय लोगों को रोजगार मुहैया कराना सरकार की भूमिका है, स्थानीय लोगों को प्राथमिकता दी जायेगी। कोका-कोला एक बहुत बड़ी परियोजना है। महाराष्ट्र में आगे भी उद्योग आयेंगे। कोकण को विकास और प्रगति की ओर ले जाना है। यहां बड़े पैमाने पर उद्योग लगने चाहिए। निवेश की पसंद के मामले में महाराष्ट्र अग्रणी राज्य है।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के सहयोग से प्रदेश में विकास, उद्योग निरंतर बढ़ रहा है। कोंकण का समुद्री तट समृद्ध है, जिससे पर्यटन और उद्योग विकास को बढ़ावा मिलेगा। मुंबई-गोवा ग्रीन फील्ड मार्ग का निर्माण किया जा रहा है। कोंकण के विकास पर हमारा पूरा ध्यान है। इसलिए, कोंकण विकास प्राधिकरण शीघ्र ही क्रियान्वित किया जायेगा, मुख्यमंत्री ने कहा।
उद्योग मंत्री श्री सामंत ने कहा कि कम समय में ही कंपनी को कोका-कोला परियोजना के लिए सभी सुविधाएं उपलब्ध करायी गयीं। एमआईडीसी के माध्यम से सभी आवश्यक अनुमतियां प्रदान की गयीं। आज इसी कार्यक्रम में मुख्यमंत्री के हाथों कोकाकोला कंपनी को 3 लाख 7 हजार वर्ग मीटर भूमि हस्तांतरण रसीद दी जायेगी। यहां के भू-स्वामियों की कुछ समस्याएं थीं। पूर्व मंत्री रामदास कदम और हमने तथा एमआईडीसी के अधिकारियों ने ग्रामीणों की समस्याओं का समाधान किया। परियोजना शुरू होने पर 80 प्रतिशत स्थानीय लोगों को नौकरी देने की मांग है। उद्योग मंत्री श्री सामंत ने कहा, इस मांग को प्राथमिकता दी जायेगी।
000
No comments:
Post a Comment