Wednesday, 8 November 2023

डोंबिवलीकर प्रतिष्ठानतर्फे सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून डिजिटल ॲकॅडमी सुरु होणार

 डोंबिवलीकर प्रतिष्ठानतर्फे सेंटर ऑफ एक्सलन्सच्या

 माध्यमातून डिजिटल ॲकॅडमी सुरु होणार

मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पुढाकार

 

            मुंबईदि. ७ : डोंबिवली परिसरातील तरुणाईला तंत्रज्ञान क्षेत्रात "जॉब रेडी" करणारे डिजिटल प्रशिक्षण केंद्र सुरु होत आहे. कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टिम्समशीन लर्निंगडेटा अ‍ॅनालिसिस यासारख्या नोकऱ्या उपलब्ध असलेल्या क्षेत्रात सतत कर्मचारी हवे असतात. त्याच अनुषंगाने मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने डोंबिवलीकर प्रतिष्ठान व टीएनएस इंडिया फाऊंडेशन यांनी नामांकित कंपनी कॅपजेमिनीच्या सहकार्याने डोंबिवलीत सेंटर ऑफ एक्सलन्स समजली जाणारी डिजिटल अकॅडमी स्थापन केली आहे. या ॲकॅडेमीचे उदघाटन उद्या बुधवार ८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आभासी माध्यमातून करण्यात येणार आहे. 

            डिजिटल ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षणार्थींना सर्व अद्ययावत उपकरणांनी युक्त अशी अत्याधुनिक लॅब उपलब्ध होणार असून कुठल्याही शाखेचे पदवी किंवा इंजिनिअरिंगचे शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी पात्र आहेत. प्रत्येक वर्गात ३५-४० विद्यार्थी  यानुसार एकूण ५००पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. अत्यंत महत्वाचे म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयटी आणि आयटीईएस क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. डोंबिवलीकर तरुणाईला कौशल्य विकासासोबतच रोजगाराची संधी मिळायला हवी यासाठी डोंबिवलीकर प्रतिष्ठानच्यावतीने हा नवीन उपक्रम राबवण्यात येत असल्याचे मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

            या एक्सलन्स सेंटरमध्ये 'कॅम्पस टू टेक्निकल करिअर्स (C2TC)' हा उपक्रम राबवला जाणार आहे. कौटुंबिक उत्पन्न वार्षिक ५ लाखांच्या पेक्षा खाली असलेल्यांकरिता असून हा कोर्स पूर्ण मोफत असेल.  हा उपक्रम सुरू करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि डॉ. संतोष भोसले यांच्या आयआयकेअर फाऊडेशनचे विशेष सहकार्य लाभले आहे.

             हे सेंटर ऑफ एक्सलन्स वृंदावन कॉम्प्लेक्सगणेशनगरडोंबिवली पश्चिम येथे डोंबिवलीकर प्रतिष्ठानची स्थापना होणार आहे.  १८ ते २५ वर्षे या वयोगटातील वंचित तरुण-तरुणींना आयटी आणि आयटीईएस क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी आवश्यक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा मानस असून मुली/महिलांच्या कौशल्य विकासावर विशेष भर देण्याचे ठरवले आहे, अशी माहिती मंत्री श्री. चव्हाण यांनी दिली.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi