Wednesday, 8 November 2023

सावित्रीदेवी फुले महिला शासकीय वसतिगृह सुरु करण्याचे कालबद्ध नियोजन करावे

 सावित्रीदेवी फुले महिला शासकीय वसतिगृह सुरु करण्याचे

 कालबद्ध नियोजन करावे

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

            मुंबई,दि.7 :  सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयातील विद्यार्थिंनीचे शासकीय वसतिगृह वांद्रे येथे स्थलांतर करण्यासाठी नवीन इमारत उभारण्यात आली आहे. हे वसतिगृह डिसेंबर 2023 पर्यत सुरू होण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

            मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज वसतिगृह तातडीने सुरू करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,  उपसचिव अजित बाविस्कर उपसचिव प्रताप लुबाळसहसंचालक हरिभाऊ शिंदेकार्यकारी अभियंता मनोज राणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीवांद्रे येथील सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयांसाठी तयार करण्यात आलेल्या इमारतीची पाहणी करून विद्यार्थिनींसाठी आवश्यक असलेले साहित्य, सीसीटीव्ही, महिला सुरक्षारक्षक तातडीने नियुक्त करावेत. तसेच पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, फायर ऑडिट यासारख्या आवश्यक सर्व परवानगीचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन डिसेंबरमध्ये हे वसतिगृह सुरू करण्याचे नियोजन करावे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi