शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन
ठाणे,दि.15:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी नायब तहसिलदार श्री.दिनेश पैठणकर, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक श्री.प्रभाकर काळे उपस्थित होते.
0000
फोटो ओळ -
शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment