*कित्येक वर्षापासून फटाके न वाजवणारी दोन गावे*
वाचून आश्चर्य वाटलं नां?
तमिळनाडूतील तिरुपत्तूर जवळील *वेतांगुडीपट्टी आणि पेरिया कोल्लुकुडीपट्टी* या दोन गावातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून फटाके न फोडता दिवाळी साजरी करतात.
कारण..
*त्यांना पशू-पक्ष्यांना दुखवायचे नसते.*
या गावातील रहिवाशी म्हणतात,
*“आम्ही या गावात पक्ष्यांसाठीच फटाके फोडत नाही. पक्षी हे आपल्या पाळीव प्राण्यासारखे आहेत म्हणून आम्ही फटाके फोडणे पूर्णपणे टाळतो. आमच्या मुलांनाही पक्ष्यासाठी फटाके फोडण्यापासून दूर ठेवले आहे. कित्येक वर्षे झाली आहेत, आम्ही कधीही फटाके वाजवून दिवाळी साजरी केलेली नाही,”*
त्यामूळे आज...
*वेतांगुडी हे पक्ष्यांचे अभयारण्य झाले आहे.*
हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास झाले आहे.
हे पक्षी *स्वित्झर्लंड, रशिया, इंडोनेशिया आणि श्रीलंका* येथून उड्डाण करतात.
या *अभयारण्यात वर्षाला 15,000 पक्षी आकर्षित होतात.*
जवळपास अर्ध्या शतकापासून स्थलांतरित पक्ष्यांच्या 200 हून अधिक प्रजातींसाठी सुरक्षित आणि संरक्षित प्रजनन स्थळांपैकी ही गावे व तेथील अभयारण्य मानले गेले आहे.
हे पक्षी अनेक वर्षापासून वेतांगुडी, पेरिया कोल्लुकुडी पट्टी आणि चिन्ना कोल्लुकुडी पट्टी येथील सिंचन तलावांवर येत असत. *फटाक्यांमुळे त्यांच्या मनात भीती निर्माण होऊन त्यांच्या येण्यावर परिणाम होऊ लागला.*
*तेव्हापासून स्थानिक ग्रामस्थ फटाकेविरहित उत्सव साजरा करू लागले.*
आता पशू-पक्षी येथे *शांततेत* राहतात.
ग्रामस्थ म्हणतात, "आम्ही दिवाळीतच नव्हे, तर *सण, उत्सव, लग्न यामध्येही फटाके फोडत नाही.. आम्ही फटाके फोडणे टाळतो, कारण ते पशू-पक्ष्यांना त्रास देतात. इथे येणार्या पक्ष्यांना आम्ही आपली घरची मुलं म्हणून पाहतो.”*
ग्रामस्थांच्या या निर्णयाचे कौतुक म्हणून *वनविभागाच्या वतीने प्रत्येक दिवाळीला गावांतील रहिवाशांना अर्धा किलो मिठाईचे वाटप केले जात असते.*
हे अभयारण्य मदुराईपासून ५१ किलोमीटर अंतरावर आहे
मागील रविवारी कोलकत्ता-इडनगार्डन्स येथे सामन्यानंतर झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पोलीस ड्युटीवरील घोड्याचा मृत्यु अनेक संवेदनशील मनांना हेलावून गेला. हवाप्रदूषण- ध्वनिप्रदूषण याचे चटके मानवाला आता बसू लागले आहेत. तरीही काहीजण अजूनही डोळ्यावर घोड्यासारखी झापडे लावून वागत आहेत.
*अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. आपली संस्कृती-परंपरा यांचे जतन करणे हे महत्त्वपूर्ण आहेच.*
पण आनंदाचा हा सण साजरा करताना---
निसर्गाचा वरदहस्त असलेल्या आपल्या देशात ध्वनिप्रदूषण, हवाप्रदूषण वाढवून,
आपण *आपल्याच भावी पिढीला अंधारात ढकलत आहोत* याचे भानही येणे गरजेचे आहे आणि....
सोबत फटाक्यांना ठामपणे नाही म्हणण्याची *ठोस कृती.*
*वेतांगुडीपट्टी आणि पेरिया कोल्लुकुडीपट्टी या गावातील सुजाण ग्रामस्थांप्रमाणे.*
बघा पटतंय कां?
🙏
No comments:
Post a Comment