*घरे गेली अंगणे गेली*
*नाती गोती फाटत गेली..*
*प्रेम, जिव्हाळा,माया, ममता*
*सारी सारी लुप्त झाली.*
*चार-चार बेडरूम्सची घरे झाली!*
*पण आई वडिल,वृद्धाश्रमी गेली..*
*आई-वडिलांचे कष्टं.. ऋणं..*
*सारे मुले विसरून गेली..*
*आजीआजोबांची नातवंडं*
*पाळणाघरातली children झाली*
*सोडायला बाई, आणायला बाई*
*घरच्या मायेला पारखी झाली..*
*सारी 'extremely busy' झाली*
*विचारपूस करी ना कोणी..😷*
*रक्ताचीही नाती आता*
*WhatsApp मध्ये बंद झाली..!*
*प्रत्येकाची वेगळी खोली*
*प्रत्येकाला स्पेस झाली*
*घरातल्याच माणसांमधल्या*
*संवादांची होळी झाली..*
*हॉटेलिंगची फॅशन आली*
*घरची जेवणे बंद झाली..*
*Modular च्या kitchen मध्ये*
*सगळी..बाहेरच जेवुन आली !*
*खोल्यांची संख्या वाढत गेली*
*माणसे मात्र कुढत गेली..*
*मी, मला, माझे माझे*
*स्वार्थामुळे ममता गेली*
*चिमुकल्यांची मनेच तुटली..*
*पैशामुळे नीती गेली..*
*नीतीमुळे मती गेली..*
*अहो पैशासाठी माणसाने*
*माणुसकी सोडून दिली*
*फेसबुक, गुगल, सगळे असून*
*का डिप्रेशन ची पाळी आली?*
*प्रत्येकाला शुगर, बीपी ..*
*हार्ट चीही गोळी आली !*
*इंटरनेट ने क्रांती केली !*
*मोबाईल ने जादू केली !*
*स्वत:च्याच कोषामध्ये*
*माणसे आता मग्न झाली..*
*माणसे जाऊन यंत्रे आली !🖥*
*यंत्रांची मग तंत्रे आली ! 🤕*
*यंत्रे-तंत्रे सांभाळताना*
*माणुसकीची फरफट झाली..*
*सुखं सांगायला कोणी नाही..*
*दु:ख ऐकायला कोणी नाही..*
*'Sharing' च्या या जमान्यात*
*माणुसकी मात्र उरली नाही*
*चला यंत्र थोडी बाजूला ठेवूया*
*विचारपूस करण्या घरी जाऊया*
*नाती गोती सांभाळुनी*
*आपण थोडे जवळ येऊया..🙏*
No comments:
Post a Comment