Thursday, 2 November 2023

केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी 3 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

 केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी

3 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

- मंत्री धनंजय मुंडे

केंद्राकडून राज्याच्या कृषी विभागाची विनंती मान्य

 

            मुंबई दि. 02 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत फळ पीक विमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

            प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये केळी या पिकाचा विमा भरण्यास 31 ऑक्टोबर 2023 अंतिम मुदत देण्यात आली होती. 31 ऑक्टोबर पर्यंत सुमारे 45 हजार 731 अर्जदारांनी केळी पिकासाठी विमा योजनेत सहभाग घेतला होता. तांत्रिक अडचणींमुळे काही केळी उत्पादक शेतकरी या योजनेत ठराविक वेळेत सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे मंत्री श्री. मुंडे यांनी केंद्राकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.

            मंत्री श्री. मुंडे यांची ही विनंती मान्य करण्यात आली असून3 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मंत्री श्री. मुंडे यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेतील सहभाग वाढवून आपला विमा निर्धारित वेळेत भरून घ्यावाअसे आवाहनही केले आहे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi