Wednesday, 6 September 2023

पनवेल तालुक्यातील वळवली येथील आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 पनवेल तालुक्यातील वळवली येथील आदिवासी बांधवांच्याशिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट


 


            मुंबई, दि. ६ : पनवेल तालुक्यातील वळवली येथील आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी वळवली येथील शासकीय जमिनीवरील आदिवासी बांधवांचे अतिक्रमण नियमित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.


            मंत्रालयात झालेल्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी वळवली येथील सर्व्हे क्र.४९/०, खाते क्र.११२ मधील ४७.४४ हेक्टर शासकीय जमीन आदिवासी बांधव पूर्वजांपासून कसत आहेत. गावातील आदिवासी बांधवांचे हे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. या जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे आदेश महसूल विभागाने यापूर्वी काढले आहेत. वळवली गाव सिडकोच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने महसूल विभागाने प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सिडकोकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव सिडकोमार्फत अंतिम मंजुरीसाठी मंत्रालयस्तरावर पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या अंतिम मंजुरीबाबत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासोबत यावेळी चर्चा केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi