गगनाला गवसणी घालणारा; शून्यातुन विश्व निर्माण करणारा अवलीया पत्रकार म्हणजे आत्मलिंग शेटे
--------------------------
जिसका कोई नही उसका तो खुदा है यारो..!! त्याप्रमाणे घरातुन कोणताही सामाजिक, धार्मिक, राजकीय, पत्रकारिता असा कोणताच वारसा नाही. ना-वडील-ना-भाऊ ना चुलता. वडील लहानपणीच न कळत्या वयातच म्हणजे वयाच्या चौथ्या वर्षीच वडील वारले. मग आई-बहिणी सोबत मामाकडेच प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले. नंतर काही कारणास्तव मॅट्रीक-आय.टी.आय.शिक्षण घेवून घर सोडले व स्वतःचा इतिहास स्वतःच लिहणारे आमचे अवलीया पत्रकार परम मित्र व नातेवाईक आत्मलिंग शेटे हे आहेत.
पुणे येथे काही दिवस या आमच्या या मित्राने फक्त 150 रुपये पगाराने गॅरेजला व कंपनीत काम केले. नंतर परळी येथे स्थायिक झाल्यावरही आत्मलिंग शेटे यांचे हालअपेष्टा संपल्या नाहीत. परळी येथेही थर्मल पॉवर स्टेशला शटडाउन ला रोजंदारीवर काम केले. असे करत करत मालवाहु टेम्पोचा ही व्यवसाय केला.पण शेवटी कुठेच यश मिळत नव्हते. नंतर त्याने काही दिवस वैद्यनाथ बँक मध्ये पिग्मी एजंटचे काम केले, परंतु त्याला त्याचे आवडते पत्रकारिता क्षेत्र बोलावत होते. नंतर पत्रकारितेकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला व पुन्हा मागे वळुन पाहिले नाही.
-0 पत्रकारितेला सुरूवात 0-
इ.स.1985 मध्ये पत्रकरितेची सुरूवात केली व सुरवातीला अंबाजोगाई मधील जेष्ठ व निर्भिड पत्रकार अमर हबीब यांचे सा.अंबाजोगाई परिसर नावाचे वृत्तपत्र होते. त्यांचे पत्रकार म्हणून काम सुरू केले व नंतर स्वतःचे 23 मे 1993 रोजी स्व.ना.गोपीनाथराव मुंडे, स्व.ना.विमलताई मुंदडा, स्व.राजेश्वरराव देशमुख, स्व.भगवानराव लोमटे यांच्या हस्ते “सा.परळी समाचार”चे प्रथम अंकाचे प्रकाशन केले व या छोट्याशा वृत्तपत्र क्षेत्रातील रोपट्याचे संगोपन करुन ते आता 31 व्या वर्षात पर्दापन करीत असून जनमाणसात सर्व परिचीत असून अन्याय अत्याचाराच्या विरोधात परखडपणे प्रकाशित होत असते. त्यांच्या या वृत्तपत्राच्या यशस्वी वाटचालीमध्ये स्व.मोहनलालजी बियाणी, स्व. काशीनाथ वरपे, स्व.एम.पी.कनके, शंकरअप्पा मोगरकर, शिवशंकर झाडे, लक्ष्मण वाकडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे. त्यांनी सुरूवातीला दै.मराठवाडा साथी परळी, दैनिक मराठवाडा औरंगाबाद, दै.तरुण भारत सोलापूर, दै.यशवंत लातूर, दै.लोकाशा बीड इत्यादी वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कार्य केलेले आहे.
-0 मान्यवरांकडुन पुरस्कार 0-
24 जुलै 2022 ला अ.भा.मराठी साहित्य परिषदेचा “पत्रकार भुषण” हा पुरस्कार, राष्ट्रीय अध्यक्ष शरदजी गोरे, संमेलनाध्यक्ष कवीयत्री जयश्रीताई बोहरा, उद्योगपती बाबाजी पाटील पनवेल यांच्या हस्ते देण्यात आला.
10 मार्च 2022 ला पुणे येथे “राज्यस्तरीय गुणीजन दर्पणरत्न” हा पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने मुख्य संयोजक अॅड.कृष्णाजी जगदाळे, ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर, समाजसेविका सौ.सुवर्णाताई खेडकर यांच्या हस्ते देण्यात आला.
6 जानेवारी 2022 रोजी परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा “जीवन गौरव” हा पुरस्कार मा.ना.पंकजाताई मुंडे, विकासराव डुबे, जुगलकिशोर लोहिया इत्यादी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. 6/1/2018 रोजी दर्पण दिनानिमित्त समाजसेविका डॉ.शालीनीताई कराड, डॉ.बालासाहेब कराड यांनी ‘रिपोर्टर ऑफ द इअर’ हा मानाचा पुरस्कार आत्मलिंग शेटे यांना संपत्नीक देण्यात आला होता.
कोवीड-19 कोरोना काळात जाहीर पत्रक, वृत्तपत्रात लेख,फोटो इत्यादीचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लॉकडाउन मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आत्मलिंग शेटे यांचा “कोरोना योद्धा” हा पुरस्कार 15 ऑगस्ट 2020 ला ग्राहक संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजयजी पाठक अकोला यांनी दिला तर दुसरा पुरस्कार “कोरोना योद्धा” पुरस्कार नाशिक येथील जयहिंद क्रांती सेना मिशनचे या सामाजिक संस्थेच्या वतीने वृत्तपत्र माध्यमातून चांगले लिखान केल्याबद्दल, पोलिस प्रशासनाला मदत केल्याबद्दल 20/7/2020 रोजी प्रदेशाध्यक्ष डॉ.आनंदसिंग मोहिते यांनी “कोरोना योद्धा” म्हणून प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
-0 सामाजिक कार्य 0-
आत्मलिंग शेटे यांनी पत्रकारितेसोबतच विरशैव समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेत असतात. त्यांनी सुरूवातीला1985 मध्ये गणपती उत्सवापासून सुरवात केली व नंतर सुरवातीला डॉ.सुरेशअप्पा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली वधु-वर सुचक मेळावा, सामुहिक विवाह सोहळयामध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेवून विविध पदावर काम केलेले आहे.
2004 मध्ये अ.भा.शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहरजी धांडे सर यांच्या नेतृत्वाखाली, शिवा संघटनेचे जिल्हा उपप्रमुख म्हणूनही कार्य केले. युवा संघटन कलेले आहे.
इ.स.2005 मध्ये परळी येथील वीरशैव समाजाचे जेष्ठ नेते दत्ताप्पा इटके गुरूजी, विजयकुमार मेनकुदळे, सोमनाथअप्पा हालगे यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र विरशैव सभेचे जिल्हा युवा संघटक व जिल्हा सचिव म्हणून 15 वर्ष कार्य केलेले आहे.
सध्या 2023 पासून महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक मा.काकासाहेब कोयटे, अध्यक्ष सुनिलशेठ रुकारी, उपाध्यक्ष राजेंद्रआबा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आत्मलिंग शेटे यांची दि. 21 जुन 2023 रोजी लिंगायत संघर्ष समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करुन त्यांना समाजाचे एकत्रिकरण करणे, समाजाचे विविध प्रश्न, अडीअडचणीसाठी प्रयत्न करावेत म्हणून आत्मलिंग शेटे यांची निवड करुन त्यांचा समाज कार्याचे कौतुकच केलेले आहे.
आत्मलिंग शेटे यांनी सोनपेठ येथे श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या 9/11/2005 रोजी झालेल्या 5 वा पट्टभिषेक वर्धापन दिनानिमित्त पंचजगद्गुरू अड्डपालखी सोहळा या कार्यक्रमात सचिव म्हणून त्यांनी चांगले कार्य केले.
विरशैव समाजाचे विरशैव जोडो अभियानात सक्रीय सहभाग घेतला तसेच काकासाहेब कोयटे, सुनिलशेठ रुकारी, राजेंद्रआबा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथअप्पा हालगे, दत्ताप्पा ईटके, विजयकुमार मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सोबत दिनांक 11/7/2014 रोजी कराड येथे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर मोर्चात व उपोषणात सक्रीय सहभाग घेतला होता.
तसेच परळी येथे 15/7/2014 रोजी विरशैव समाजाला अल्पसंख्यांक दर्जा व आरक्षण मिळावे तसेच स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा म्हणून जो परळी शहरातील मुले, महिला पुरूष यांचा जो भव्य असा मोर्चा काढला होता. त्यात आत्मलिंग शेटे यांचा संयोजनात सिंहाचा वाटा होता व नंतर दत्ताप्पा इटके गुरूजी, सोमनाथअप्पा हालगे, विजयकुमार मेनकुदळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढुन उपजिल्हाधिकारी मा.सविताताई चौधर यांना विरशैव समाजाच्या वतीने निवेदन दिले होते. त्यात सक्रीय सहभाग घेतला होता.
5/6/2019 रोजी परळी येथे मा.अरविंदजी जत्ती यांच्या संकल्पनेतून जगतज्योती समतानायक, महात्मा बसवेश्वर संदेश यात्रा निमित्त परळी शहरात 14 फुटाचा भव्य अशा पुतळा असलेल्या संदेश यात्रेचे व बसव बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष मा.अविनाशजी भोशीकर यांच्या नेतृत्वाखाली या संदेश यात्रेचे आयोजन करण्यामध्ये आत्मलिंग शेटे यांचा संपुर्ण सहभाग होता.
-0 विरशैव गौरव पुरस्कार 0-
आत्मलिंग शेटे यांना लातूर येथे दि.4/6/2016 रोजी राष्ट्रसंत डॉ.ष.ब्र.प.शिवलिंग शिवाचार्य महाराज, खा.सुनिल गायकवाड, आ.महादेव जानकर, उद्योगपती शंकरराव बोरकर यांच्या हस्ते मा.प्रा.सुदर्शन बिराजदार यांनी बसव मेळाव्यामध्ये “समाजभुषण” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आली.
तर नांदेड येथे महात्मा बसवेश्वर समता परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय “बहुजनरत्न” हा पुरस्कार प्रदेशाध्यक्ष संतोषजी देशमुख व डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, बसव ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अविनाश भोशीकर, आ.रामराव अडकुते यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे.
19/4/2018 रोजी मुरुम येथे बसव परिषदेच्या वतीने अध्यक्ष श्रीशरण बसवराज पाटील व बसव परिषदेचे अध्यक्ष रामलिंग पुराणिक यांनी आत्मलिंग शेटे यांना भव्य अशा कार्यक्रमात बसवरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.
11/3/2018 रोजी भोर येथे उन्नती महिला प्रतिष्ठाणच्या वतीने “पत्रकार भुषण” पुरस्कार देण्यात आला. असे अनेक पुरस्कार हे आत्मलिंग शेटे यांना देण्यात आलेले आहेत.
-0 रेल्वे बोर्ड सदस्य 0-
तसेच आत्मलिंग शेटे यांना दि.23/2/2013 मध्ये स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांनी रेल्वे बोर्ड कमेटी सदस्य म्हणून शिफारस केली. तसेच खा.प्रितमताई मुंडे यांनी देखील रेल्वे बोर्डाला शिफारस केल्यानंतर 3 टर्म रेल्वे बोर्ड कमेटी सदस्यपदी (डी.आर.यु.सी.सी.मेंबर) काम केलेले आहे. यामध्ये परळी रेल्वे स्टेशन मध्ये अनेक सुविधांचा सिकंदराबाद येथील डी.आर.यु.सी.सी.मिटींग मध्ये पाठपुरावा करुन विषय मांडले आहेत. अनेक मागण्या मान्य करुन घेतल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळातच फुट ओव्हरब्रिजवर शेड, अपंगांसाठी लिफ्ट नांदेड-पनवेल गाडीला डब्बे प्रवासी वाढवणे, तिरुपती बालाजी गाडीसाठी प्रयत्न केलेले आहेत. दिव्यांगासाठी पास सवलत योजनेसाठी भरपूर दिव्यांगांना पासेस मिळवुन दिलेले आहेत. तसेच रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवर भव्य अशी श्री महादेवाची पिंडीची स्थापना केली.
-0 विविध कार्य 0-
सध्या आत्मलिंग शेटे यांनी मानवता कल्याण मंडळ, ज्योतिर्लिंग सामाजिक प्रतिष्ठाण, पत्रकार संघटना, प्रवाशी संघटना, पोस्ट सल्लागार समिती, रामेश्वर देवस्थान, विरशैव दिनदर्शिका प्रकाशन इत्यादी अनेक संस्था, संघटनेत विविध पदावर कार्यरत आहेत.
20 ऑगस्ट 2023 रोजी त्यांची मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या परळी तालुका समन्वयक म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष एस.एम.देशमुख व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक दत्तात्रय आंबेकर यांनी आत्मलिंग शेटे यांचे कार्य पाहुन नियुक्ती केलेली आहे.
आत्मलिंग शेटे यांनी समाजकार्यात विविध क्षेत्रात काम केलेले आहे. त्यांचा परळीतील विविध संस्था, संघटनेच्या वतीने ही त्यांचा सत्कार करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सर्वश्री डॉ.हरिश्चंद्रजी वंगे दादा, वि.दा.सावरकर पतसंस्थेचे चेअरमन बाजीरावभैय्या धर्माधिकारी, बन्सलचे महाराष्ट्राचे प्रमुख चंदुलालजी बियाणी, विरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष दत्ताप्पा इटके गुरूजी, वारकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे, वैद्यनाथ देवस्थानचे सचिव राजेश देशमुख, जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ, जगद्गुरू भीमाशंकरलिंग महास्वामीजी केदारपीठ, एस.टी.कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश गित्ते, बालाजी दहिवाळ, सुरेशजी टाक, पत्रकार संघ इत्यादींच्या वतीने अनेक वेळेस आत्मलिंग शेटे यांचा सत्कार झालेला आहे असे हे आमचे परममित्र आत्मलिंग शेटे यांचा आज दि.30/9/2023 रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना माझ्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा, त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रभु वैद्यनाथ चरणी प्रार्थना..!
............................
- बबनअप्पा डांगे (गुरुजी)
पद्मावती विभाग, परळी वैजनाथ, जि.बीड
मो.8308476199