Saturday, 30 September 2023

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून ओबीसी समाजाची बैठक

 मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्र्यांकडून ओबीसी समाजाची बैठक

 

इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता

मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका

 

                                                                      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

 

            मुंबईदि. २९: इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. इतर मागास समाजाचे महामंडळसारथीबार्टीमहाज्योतीटीआरटीआय या संस्थांना निधी वाटपात सुसुत्रता आणतानाच सर्व समाज घटकांना समप्रमाणात न्याय देण्यात येईलकेंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेची सांगड घालत राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करून बारा बलुतेदारांना लाभ मिळवून दिला जाईलअशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

            सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास वर्ग तसेच भटके-विमुक्त समाजातील विविध संघटनांसमवेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळइतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेवन मंत्री सुधीर मुनगंटीवारखासदार रामदास तडसआमदार सर्वश्री डॉ. संजय कुटेपरिणय फुकेगोपीचंद पडळकरमाजी आमदार प्रकाश शेंडगेमुख्य सचिव मनोज सौनिकमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेराष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीत इतर मागासवर्गभटके-विमुक्तबारा बलुतेदार आदी समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले म्हणणे मांडले.

            कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी करण्याची शासनाची भूमिका नाहीअसे स्पष्ट करीत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  सांगितले कीमराठा समाजाचे रद्द झालेलं आरक्षण पुन्हा मिळवून देताना इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले देण्यासंदर्भात निवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यवाही सुरू आहे. राज्य शासन इतर मागासभटक्या विमुक्त समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. 

            राज्यातील सारथीबार्टीमहाज्योतीटीआरटीआय या महामंडळाना निधी देताना कुठलाही भेदभाव होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही देतानाच भटक्या विमुक्तांच्या विविध प्रश्नांबाबत स्वतंत्रपणे बैठक घेण्यात येईलअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इतर मागास समाजातील विद्यार्थ्य़ांसाठी ७२ वसतीगृहे तातडीने सुरू करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ देताना नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र असल्यास आठ लाखाच्या मर्यादेचं प्रमाणपत्राची अट मागे घेण्यासंदर्भात तपासणी करण्याची सुचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

 

इतर मागास समाजासाठी ४००० कोटी रुपयांच्या योजना- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            राज्य शासनाच्या माध्यमातून इतर मागास समाजासाठी सुमारे ४००० कोटी रुपयांच्या योजनांची अमंलबजावणी करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. केंद्र शासनाने ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतला असून वैद्यकीय प्रवेशामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याचा निर्णयही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. राज्य सरकार इतर मागास समाजावर अन्याय होऊ देणार नाहीअशी ग्वाहीही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

 

भटक्या विमुक्त समाजाला भरघोस निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            राज्यातील भटक्या विमुक्त समाजाला आणि त्यातील दुर्लक्षीत घटकांना भरघोस निधी देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. कोणत्याही घटकाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे सांगतानाच हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे सारथीबार्टीमहाज्योतीटीआरटीआय या महामंडळांना निधी उपलब्ध करून दिला जाईलअसेही श्री. पवार यांनी सांगितले.

            यावेळी मंत्री श्री. भुजबळ यांच्यासह श्री. शेंडगेश्री. तडसडॉ. तायवाडेश्री. बावकरश्री. पडळकरलक्ष्मणराव गायकवाडपल्लवी रेणकेमंगेश ससाणेविश्वनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 

      बैठकीस राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जिवतोडेसचिन राजुरकरपुरुषोत्तम प. शहाणे (पाटील)शरद वानखेडेसुभाष घाटेनरेश बरडेशकील पटेलदिनेश चोखारेप्रकाश भगरथभालचंद्र ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

००००

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi