*अंदमान बोलावतंय !*
*महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेली अंदमान यात्रा, नव्या हंगामाची नोंदणी सुरू करत आहोत.*
*आपल्या सर्वांचे आराध्य दैवत स्वा. सावरकर यांची अंदमनातून मुक्तता होऊन १०१ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने सावरकरांना अभिवादन करण्यासाठी शब्दामृत प्रकाशनातर्फे ही विशेष सहल आयोजित करण्यात येत आहे संपूर्ण प्रवासात सावरकर विचारांचा जागर करण्यासाठी प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, इतिहास अभ्यासक पार्थ बावस्कर हे सोबत असतील. या सहलींचे आणखी एक आकर्षण म्हणजे झी मराठी सारेगमप मधील आपल्या सर्वांची लाडकी गायिका मुग्धा वैशंपायन. या सहलीदारम्यान दररोज स्वा. सावरकर रचित गीते आपल्या सर्वांसमोर मुग्धा वैशंपायन आपल्या गोड स्वरातून सादर करणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य तपशील व काही वैशिष्ट्ये सोबत देत आहोत.*
*१. स्वा. सावरकरांना अभिवादन करण्यासाठी वंदे मातरम्, जयोस्तुते, आणि ने मजसी ने या गाण्यांचे गायन व सावरकरांची मुक्तता होऊन १०१ वर्ष झाली या निमित्ताने १०१ ज्योती प्रज्वलित करण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित केला जाईल.*
*२. या कार्यक्रमादरम्यान व्याख्याते पार्थ बावस्कर हे सेल्युलर कारागृहात व्याख्यान देतील. प्रसिद्ध गायिक मुग्धा वैशंपायन यावेळी सावरकरांची गीते गातील. या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार होण्याची ही सुवर्णसंधी.*
*३. अंदमान प्रवासात संपूर्णपणे ३ स्टार उत्तम दर्जाच्या हॉटेलमध्ये निवास व्यवस्था असेल. ट्विन शेअरिंग तत्वावर रूम्स असतील.*
*४. दररोज एकवेळ नाश्ता, एकवेळ चहा, आणि दोनदा उत्तम दर्जाचे शुद्ध शाकाहारी जेवण ( दोन्ही वेळीं गोड पदार्थ ) अशी परिपूर्ण व्यवस्था या प्रवासात असेल.*
*५.अंदमानात स्थळदर्शन करतांना प्रत्येक वेळी एसी बस / टेम्पो ट्रॅव्हलर गाडीचा प्रवास असेल.*
*६. या विशेष सहलीत मुख्य आकर्षण म्हणजे अंदमानातील प्राणी आणि पक्षी यांच्याशी संवाद साधणार्या, त्यांच्याशी बोलणाऱ्या श्रीमती अनुराधा राव यांच्या तोंडून सावरकरांचे आजवर कधीही न ऐकलेले अनुभव ऐकता येतील.*
*७. सहभागी प्रत्येकाला सावरकरांनी त्यांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेसोबत गळ्यात अडकवलेला बिल्ला अभिमानाने धारण करायचा आहे,आमच्यातर्फे सहभागी प्रत्येकाला हा ऐतिहासिक आणि दुर्मिळ बिल्ला भेट देण्यात येईल. या बिल्याचे महत्व अनन्यसाधारण आहे.*
*८. सहलीत दररोज व्याख्याते,लेखक पार्थ बावस्कर हे सावरकरांच्या जीवनावरील विविध पैलू उलगडणारे व्याख्यान सादर करतील. दररोज एक तास हे व्याख्यान होईल. मुग्धा वैशंपायन विविध राष्ट्रभक्तीपर गीते गातील.*
*९. सहलीदरम्यान पार्थ बावस्कर यांच्या संकल्पनेतून साकारलेला "हे मातृभूमी तुजला" हा कार्यक्रम मुग्धा वैशंपायन आणि पार्थ बावस्कर सादर करतील.*
*१०. पोर्टब्लेअर शहर, नेताजी सुभाष -पूर्वीचे रॉस बेट, शहीद बेत - नील बेट,स्वराज्य बेट - हॅवलॉक बेट या विविध स्थळांना भेटी देण्यात येतील. शहीद व स्वराज्य बेटांवर प्रत्येकी एक रात्र मुक्काम असेल, येथील समुद्रकिनारे जगभर प्रसिद्ध आहेत, आशिया खंडातील क्रमांक २ वर असणाऱ्या राधानगरी बीचवर भरपूर वेळ घालवता येईल.*
*११. लाईमस्टोन लेणी या खाऱ्या पाण्यापासून बनलेल्या गुफा आणि सोबतच जारव्हा नावाचे दुर्मिळ आदिवासी प्रजाती हे दोन्ही बघण्याची सुवर्णसंधी या सहलीत आम्ही उपलब्ध करून देत आहोत. सोबत मॅनगृव्ह फॉरेस्टला भेट देण्यात येईल.*
*१२. संपूर्ण दिवसभरात सावरकरांनी जो त्याग केला, जे कष्ट भोगले त्याची माहीत नसलेली कहाणी ऐकत ऐकत अंदमानातील सर्वोत्तम आणि जगप्रसिद्ध स्थळांना भेटी देण्यासाठी विशेष आयोजन म्हणजे "अंदमान बोलावंतय" ही विशेष सहल.*
*१३. या प्रवासादरम्यान ६ तासांचा अविस्मरणीय जहाज प्रवास करायचा आहे तोही काळ्या पाण्याच्या समुद्रातून. हा प्रवास तीन टप्यात असेल.*
*पोर्ट ब्लेअर ते स्वराज्य द्वीप*
*स्वराज्य ते शहीद द्वीप*
*शहीद ते पोर्ट ब्लेअर*
*१४. दिनांक 20 ते 26 नोव्हेंबर 2023*
*दिनांक 22 ते 28 जानेवारी 2024*
*या यंदाच्या तारखा आहेत. पोर्ट ब्लेअर येथे दुपारी १ पर्यंत पोहोचेल असे विमान आपण बुक करायचे आहे.*
*१५. सावरकरांच्या मुक्ततेनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी ही सहल आहे, त्यामुळे निवडक सावरकरप्रेमीना सहभागी करून घेण्यात येईल. यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची विशेष काळजी घेतली जाईल.*
*१६. एकूण मूल्य आहे ३९,५००/- ( incl GST ) ज्यात अंदमान ते अंदमान असा संपूर्ण प्रवास, निवास, जेवण, स्मारकाची तिकिटे, जहाज प्रवास यांचा समावेश आहे. मुंबई किंवा पुणे येथून अंदमान पर्यंत विमानाची तिकिटे आपण काढायची आहेत.*
*प्रत्येकी रुपये १०,०००/- विनापरतावा भरून आपण आपली जागा नक्की करू शकता.*
*१७. अंदमानातील बहुतांश स्थळे दाखवणारी तसेच व्याख्याते,लेखक पार्थ बावस्कर यांची व्याख्याने आणि मुग्धा वैशंपायन यांची गीतमैफल आयोजित करणारी ही एकमेव यात्रा आहे.*
*१८. या यात्रेतील सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे सेल्युलर कारागृहात जाऊन सावरकरांना अभिवादन करणे. यासाठी आपण बराच वेळ राखून ठेवला आहे. यावेळी आपल्याला तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.*
*१९. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानात सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकवला. त्या स्थानावर आज एक अतिभव्य भारताचा तिरंगा उभारण्यात आला आहे. या यात्रेत आपण सायंकाळी तिरंगा स्थानाला भेट देऊन अभिमानाने त्याची कहाणी पार्थ बावस्कर यांच्याकडून ऐकून घेणार आहोत. या ठिकाणी मुग्धा वैशंपायन यांच्या सुमधुर स्वरात आपण राष्ट्रगीत आणि वंदे मातरम मोठ्या अभिमानाने गणार आहोत.*
*२०. अंदमानातील ख्यातनाम आणि जगविख्यात असलेला लेझर शो पाहून कार्यक्रमाची सांगता होईल.*
*मित्रहो,*
*ज्या सावरकरांनी अंदमानात ५० वर्ष शिक्षा भोगण्याच्या इराद्याने पाऊल ठेवले, हाल सोसले त्यांना वंदन करण्यासाठी एकदा तरी अंदमानला जायलाच हवे. आतापर्यंत सुमारे दीड हजार लोकांना आम्ही यशस्वी अंदमान सहल घडवली आहे. आपणही हा अनुभव घ्या. आपल्या प्रत्येकाचे ते कर्तव्य आहे.आपण आपल्या परिचितांना या सहलीत सामील करा, तरुणांपर्यंत हा सावरकर विचार नेण्यासाठी ही माहिती आपल्या परिचितांना नक्की शेअर करा, चला, अंदमान बोलावंतय !*
आपले
*शब्दामृत प्रकाशन*
*बुकिंगसाठी सम्पर्क - ९९७००७७२५५*
No comments:
Post a Comment