*पावसाला नुकतिच दमदार सुरुवात झाली आहे.*
पावसाळा हा ऋतू सर्वांच्याच आवडिचा आहे. साहजिकच पावसाला सुरूवात झालि, की, पावसात भिजण्याचे व पावसाळि पिकनिकचे वेध अनेकांना लागतात, मात्र पावसाळ्यातिल हवामानातिल आर्द्रता अधिक प्रमाणात वाढते, ज्यामुळे हे वातावरण जीवजंतूंसाठि पोषक ठरते.
##* पावसाळा कितिहि आनंदि असला तरि या ऋ तूत आजारपण येण्याचि शक्यतादेखील तितकिच वाढते.
म्हणूनच घरात जर लहान मुलं, अथवा मोठि माणसे असतिल तर या दिवसात त्यांच्या आरोग्याचि काळजि घेण्याचि शक्यतादेखील तितकिच वाढते.
त्यात लहान मुलांना होणारा सर्दि, खोकला पावसाळ्यात या आजारांना दूर ठेवण्यासाठि आपण घरगुति काढा पाहू. याने सर्दि खोकला रोखण्यास खूप मदत होते..
##*.. लहान मुलांसाठिः वय वर्षे १, ५..
एका खोलगट भांड्यात २ च. अळशि/ जवस घालून १ मि. भाजून घ्यावि, मग त्यात १ ग्लास पाणि घालावे. १० ते १२ तुळशिचि पाने , २ खडि साखरेचे खडे, २ ज्येष्ठमधाच्या ठेचलेल्या काड्या घालून छान मिक्स करून मध्यम आचेवर उकळि काढा. अर्धा ग्लास इतपत झाले कि, गँस बंद करून, गाळुन लहान मुलांना २ वेळा द्यावा...
##* मोठ्यांसाठीः.. एका खोलगट भांड्यात २ च. अळशि/ जवस घालून मंद आचेवर भाजून घ्यावे. करपवू नये, नंतर त्यात २ ग्लास पाणि घालून, तुळशिचि पाने, खडिसाखर, ४ , काळे मिरे, ३ लवंगा, अर्धा इंच दालचिनि तुकडा, १ मोठा च. मध, २ ज्येष्ठमधाच्या ठेचलेल्या काड्या घालून मंद आचेवर उकळून घ्यावे.
१ ग्लास इतपत झाले कि, गाळून २ वेळा घ्यावे...
_
No comments:
Post a Comment