Monday, 3 July 2023

जीवन सुदंर आहे....!!"*

 *" जीवन सुदंर आहे....!!"*

                                                                   वरील फोटो मध्ये बायको सोबत भाजीपाल्याची पिशवी खांद्यावर घेतलेली व्यक्ती आहे......मराठवाडा विभागीय आयुक्त श्री.सुनील केंद्रेकर (IAS) ८ जिल्हाधिकारी त्यांना रिपोर्ट करतात. ७०-८० तहसीलदार हाताखाली काम करतात, शिवाय २०-२५ प्रांत, शेकडो क्लास १ अधिकारी सलाम ठोकतात यांना...... या केंद्रेकर यांनी मनात आणलं तर दहा-बारा नोकर हाताखाली ठेवू शकतात, परंतु या माणसाकडे भयंकर साधेपणा आहे.... 

       स्टेटस नावाचं खूळ आणि इगो नावाची भ्रांत निघून गेली की उरते ती मानव ता ! अधिकारी म्हणून ''बघणाऱ्यांचा दृष्टीकोन आणि वागणाऱ्यांचा दृष्टिकोन'' या पलीकडले व्यक्तीमत्व असते ते समान्यांतले असामान्य ! सामान्य जीवनातला जगण्याचा अनुभव केवळ लेखन करून जमत नाही. अनुभव, अनुभूती घ्यावीच लागते ! 


"साहेब, आपण स्वेच्छा निवृत्ती घेताय.... हा आम्हांस न पटणारा निर्णय आहे. देशाला तुमची अजून खूप गरज आहे. असो....

तुम्हाला खूप खूप शुभेच्छा....!!" 💐🙏


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi