*खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे*
खजूराला 'वंडरफूड' असं म्हटलं जातं. खजूर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. खजूरामध्ये लोह, मिनरल्स, कॅल्शिअम, फॉस्फरस, व्हिटॅमिन्स, अमीनो अॅसिड भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे खजूर शक्तीवर्धक, अशक्तपणा कमी करणारं आणि शरीराला ऊर्जा देणारं फळ आहे. खजूर खाल्ल्यास तुम्हाला इंस्टंट एनर्जी मिळू शकते. यासाठीच उवपवासाला खजूर खाण्याची पद्धत आहे. या फळाच्या ताज्या आणि पिकलेल्या फळाला खजूर असं म्हणतात तर त्याच्या सुकवलेल्या फळाला खारीक असं म्हणतात. आयुर्वेदानुसार खजूर शक्तीवर्धक, पौष्टिक, श्रमहारक आणि वीर्यवर्धक फळ आहे. भारतात रेताड जमिनीमध्ये खजूराची झाडं सहज उगवतात. मात्र खजूराची झाडे सौदी अरेबिया, इराक, अफगाणिस्तान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात. नियमित दोन खजूर खाण्याची सवय लावल्यास तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी जाणून घ्या खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे.
पचनशक्ती सुधारते
खजूरामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. जेव्हा तुमच्या शरीरातील पचनकार्य सुरळीत सुरू असते तेव्हा तुम्हाला पोटाच्या तक्रारी कमी प्रमाणात जाणवतात. बद्धकोष्ठता अथवा अपचनाच्या समस्या असलेल्या लोकांना नेहमी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. खजूरामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे फायबर्स असतात. यासाठी दररोज रात्री दोन खजूर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचे सेवन करा.
ह्रदयासाठी उत्तम
खजूरामध्ये असलेले फायबर्स तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. शिवाय त्यामध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशिअमदेखील असते. एका संशोधनानुसार जर एखाद्या व्यक्तीने दररोज 100 ग्रॅम मॅग्नेशिअम असलेले पदार्थ सेवन केले तर त्याला ह्रदयरोग होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे जर तुम्हाला ह्रदयाचे आरोग्य सांभाळायचे असेल तर दररोज दोन खजूर जरूर खा.
रक्तदाब नियंत्रित राहतो
खजूरामध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर असते. ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर अथवा लो ब्लड प्रेशरचा त्रास होत असेल तर दोन खजूर रोज खाण्याची सवय स्वतःला लावा.
अॅनिमियाचा त्रास कमी होतो
जर तुम्हाला रक्ताच्या कमतरतेमुळे अथवा रक्तातील लोहाचे प्रमाण कमी असल्यामुळे अशक्तपणा जाणवत असेल. तर तुम्हाला या समस्येवर लवकर उपाय करण्याची गरज आहे. कारण रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्यसमस्या डोकं वर काढतात. खजूरामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. जर तुम्ही दररोज दोन खजूर खाण्याची सवय लावली तर तुमचा अशक्तपणा कमी होतो.
सेक्स लाईफ सुधारते
खजूरामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे स्पर्म काऊंट वाढतो. बाळ जन्माला येण्यासाठी पुरूषांमध्ये शूक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता चांगली असणे गरजेचं आहे. कारण या कारणांमुळे आजकाल अनेक जोडप्यांना वंधत्वाला सामोरं जावं लागत आहे. मात्र संशोधनानुसार जर तुम्ही खजूर खात असाल तर तुमचं सेक्स लाईफ चांगलं होऊ शकतं. यासाठीच बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि वैवाहिक जीवन सुखाचं असावं असं वाटणाऱ्या पुरूषांनी दररोज खजूर खाल्ल्यास त्यांना फायदा होऊ शकतो.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते
दररोज खजूर खाण्याने केवळ डोळ्यांचे आरोग्य सुधारते असे नाही तर तुम्हाला रातांधळेपणा, रंगांधळेपणा अशा समस्या निर्माण होत नाहीत. यासाठीच दररोज खजूर खाण्यास सुरूवात करा.
दात मजबूत होतात
खजूरामध्ये फ्लोरीन नावाचे एक केमिकल असते. ज्याच्यामुळे दातांमध्ये कीड लागण्याची समस्या कमी होऊ शकते. खजूरामुळे तुमच्या हिरड्या आणि दात मजबूत होतात. यासाठी दात आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी दररोज दोन खजूर अवश्य खा
वजन वाढते
वजन कमी करण्याप्रमाणेच अनेकांना वजन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. खजूरामध्ये अनेक पोषकतत्व दडलेले असतात. ज्यामुळे दररोज सकाळी खजूर खाल्ल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. कृष प्रकृतीच्या लोकांनी दुधासोबत दररोज दोन खजूर खाल्ल्यास त्यांचे वजन वाढणे सोपे होऊ शकते.
*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,*
*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,*
*त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*
_*(कॉपी पेस्ट)*_
*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*
*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*
*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*
https://chat.whatsapp.com/G6dpqL1eDIH4pqpcCtbd3w
No comments:
Post a Comment