Monday, 12 June 2023

पायात गोळे येणे.....*

 *पायात गोळे येणे.....*


बरेच वेळा अचानक रात्री पायात गोळे येतात, असह्य वेदना येतात. आणि काही केल्या बरं वाटतं नाही. तेव्हा आपण खालील उपाय केल्यास आराम पडेल नक्कीच.


*1) एका वाटीत लिंबू रस काढून घ्या. हा रस पायाला चोळा. मग त्यांवर साधे मीठ चोळा आणि एका रुमालात खडे मीठ घालून तव्यावर गरम करून याची पुरचूंडी बांधून हळूहळू पाय शेका. या ३ गोष्टी एकत्र केल्यास पायात आलेले गोळे जातात. व आराम मिळतो.


*२) एका वाटीत तिळाचे तेल घेऊन त्यात भिमसेन कापूर पावडर टाका आणि मिक्सिंग करून हे तेल पायांना लावून चोळावे. १५ मिनिटे करा हळूहळू गोळा निघून जाईल..


*३) थोडा मऊ गूळ घ्या. यात सुंठ पावडर मिसळून घ्या आणि यांच्या बोरा इतक्या ७ गोळ्या करा आणि दररोज उपाशी पोटी सकाळी १ गोळी घ्या. असे ७ दिवस केल्यास कधीच पायात गोळे येणार नाही.


*४) ४ बदाम, १ चमचा कच्चे तिळ आणि १ चमचा खडिसाखर एकत्र करून रोज सकाळी उपाशीपोटी १ महिना खावे. आयुष्यभर पायात गोळे येणार नाही..


*५) १ पेलाभर दूधामध्ये १ चमचा नाचणीचे सत्त्व टाकून उकळून घ्या आणि यात ५ भिजवलेल्या काळ्या मनुका टाका व सकाळी उपाशीपोटी खा. असे १० दिवस करा.. शरीरात भरपूर कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही..


*६) शेवग्याच्या शेंगांची भाजी, आठवड्यातून २ वेळा खा किंवा शेवग्याच्या शेंगांचे चूर्ण रोज जेवणानंतर घ्या. याने भरपूर प्रमाणात कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही.


*७) रोज सकाळी २ डोंगरी आवळे अनशा पोटि खावे आणि दिवसातून एकदा केळं खावे.


* ८) जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळा येतो तेव्हा आपला उजवा हात उंच करा, जेव्हा आपल्या उजव्या पायात गोळे येतात तर आपला डावा हात उंच करा. तुम्हाला त्वरित बरं वाटेल.


तुम्हाला जेव्हा पायात गोळे येतील तेव्हा वरील उपाय केल्यास आराम पडेल नक्कीच.


*डॉ. सुनील इनामदार.*


🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸


*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi