Friday, 5 May 2023

हृदयाची काळजी घ्या, कोलेस्टेरॉल कमी करा*

 *हृदयाची काळजी घ्या, कोलेस्टेरॉल कमी करा*


अनेक प्रकारचे आजार आहेत जे झाले तरी लवकर लक्षात येत नाही. काही वेळा विशेष त्रास न होता हे आजार बरे होतात. आजार कोणताही असू दे शरीराची हानी ही करतोच. हृदयाचेही तसेच आहे. हृदयावर ताण आल्यास त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हा परिणाम लगेच दिसून येत नाही पण तो परिणाम जास्त त्रासदायक ठरू नये यासाठी हृदयाची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी किरकोळ स्वरुपाचा त्रास झाला तरी वैद्यकीय तपासणी करुन घेणे डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक उपचार करुन घेणे हिताचे आहे.


जग वेगाने प्रगती करत आहे, या प्रगतीसोबतच नवनव्या आजारांचा जन्म होत आहे. काही जुने आजार तीव्र स्वरुपात माणसाला त्रास देऊ लागले आहेत. यातच समावेश होतो कोलेस्टेरटल या आजाराचा. हा आजार अतिशय आरामात शरीरात प्रवेश करतो. एरवी फिट दिसणारे तरुण तरुणीही या आजाराला बळी पडू शकतात. नियमित वैद्यकीय तपासणी करणाऱ्यांना या आजाराचे संकेत लवकर मिळू शकतात. पण इतरांना हा आजार झाल्याचे कळायला वेळ लागतो. 


कोलेस्टेरॉलचा आजार जेवढा गंभीर आहे तेवढाच तो दूर करणेही सोपे आहे. पण त्यासाठी चिकाटी हवी, संयम हवा आणि सातत्य हवे. काही सोपे उपाय नियमित केले तर कोलेस्टेरॉलच्या आजारावर मात करणे शक्य आहे.


कोलेस्टेरॉल म्हणजे काय?


सोप्या भाषेत सांगायचे तर कोलेस्टेरॉल (cholesterol) हा रक्तात असलेला घटक आहे. शरीरात रक्ताभिसरण सुरळीत सुरू राहावे वेगवेगळ्या अवयवांना ऊर्जा मिळावी यासाठी रक्तातील कोलेस्टेरॉलचा वापर होतो. नैसर्गिकरित्या शरीर कोलेस्टेरॉल तयार करते तसेच फास्ट फूड, जंक फूड, भरपूर तेलाचा वापर करुन केलेले पदार्थ यांच्या सेवनामुळे शरीरात कृत्रिम कोलेस्टेरॉल प्रवेश करते. शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की ते रक्तवाहिन्यांजवळ चिकटून नव्या भिंती, नवे अडथळे निर्माण करते. यामुळे शरारीत सतत सुरू असलेल्या रक्ताभिसरण प्रक्रियेवर परिणाम होतो. रक्ताभिसरणावर परिणाम झाल्यास तब्येत बिघडण्यास सुरुवात होते. शरीरात अतिरिक्त कोलेस्टेरॉलची निर्मिती होणे या आजाराला हायपर कोलेस्ट्रोलेमिया म्हणतात.


शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आढळते. कमी घनता असलेले लिपोप्रोटीन LDL आणि जास्त घनतेचे लिपोप्रोटीन HDL कोलेस्टेरॉल शरीरात आढळते. कोलेस्टेरॉलचे शरीरातील प्रमाण वाढण्याची अनेक कारणं आहेत. यातील २ प्रमुख कारणं


आहाराच्या तुलनेत शरीराच्या हालचाली कमी असणे फास्ट फूड, जंक फूड, भरपूर तेलाचा वापर करुन केलेले पदार्थ यांचे मोठ्या प्रमाणावर सेवन

जर वजन जास्त असेल तर दोन पैकी किमान एक आणि काही वेळा दोन्ही कारणांमुळे शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. रक्ताची कोलेस्टेरॉल तपासणी करुन घ्या. यात शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण समजेल. रक्तात 200 mg/dl कोलेस्टेरॉल असेल तर चिंतेची गरज नाही. पण रक्तात 200-239 mg/dl कोलेस्टेरॉल असेल तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे हे लक्षात घ्या. जर रक्तात 240 mg/dl कोलेस्टेरॉल असेल तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण चिंताजनक आहे. कारण हे हाय कोलेस्टेरॉल आहे. ज्यांच्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते अशांना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो. 


कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्याचे सोपे उपाय


-दररोज जास्तीत उकळलेले पाणी प्या.  


-दररोज सकाळी तुळशीची २-४ स्वच्छ धुऊन घेतलेली पाने चावून खा.


 -सकाळी एक ग्लास पाण्यात लेमनग्रास तेलाचे ५ थेंब टाकून ते पाणी प्या. 


-लिंबू पाण्याने धुवून घ्या नंतर दोन ग्लास पाणी भांड्यात उकळवत ठेवा. त्यात लिंबू पिळा आणि लिंबाच्या साली पाण्यात टाका. भांड्यातील २ ग्लास पाण्याचे एक ग्लास पाणी झाले की ते गरम पाणी प्या. लिंबाच्या साली टाकून द्या.  


-दररोज सकाळी ब्रश करण्याआधी लसणाच्या (Garlic) २-४ पाकळ्या चावून खा. 


-रोजच्या आहारात मर्यादीत प्रमाणात लसणाचा वापर करा. नारळाच्या तेलापासून (Coconut oil) तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करा. 


-माशापासून तयार केलेल्या तेलाचा (Cod liver oil) खाण्याच्या पदार्थांमध्ये वापर करा आणि त्या पदार्थांचे सेवन करा. 


-ज्या पदार्थांमधून ब३, क आणि ई जीवनसत्व (vitamine B3, C, E) मिळतात अशा पदार्थांचे सेवन करा.


 -दररोज दुपारच्या जेवणात एक वाटी दह्याचे सेवन करा. दही पदार्थांच्या पचनासाठी मदत करते. 


-फास्ट फूड, जंक फूड, तेलकट पदार्थ यांचे सेवन टाळा. 

-साखर आणि मैदा यांचा वापर करुन केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा.



-बेकरी प्रॉडक्ट, चिप्स आणि वेफर्स खाणे टाळा. जेवणात --साखरेऐवजी गुळाचा वापर करा. 


-दररोज किमान एक तास वेगाने चाला. चालण्याचा व्यायाम लाभदायी आहे.

 ---------------------------------------------- 

 


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi