Friday, 5 May 2023

जीवनसत्व -व्हिटॅमिन डी. गरज

 व्हिटॅमिन डी. 

नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ,

आज आपण व्हिटँमीन डी या विषयावर चर्चा करुन याचं महत्त्व, कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या,या विषयी जाणून घेणार आहोत.जगभरातील५०टक्के जनता याच्या कमतरतेमुळे त्रासलेले आहे. मग चला तर मंडळी पाहूया हा विषय नक्की काय आहे ते.

व्हिटॅमिन डीच्या मदतीने शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढते. व्हिटॅमिन डी ची शरीरात कमतरता असेल तर वेगवेगळ्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि पोषण मिळवण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असणं गरजेचं असतं. पण सद्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनेकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे व्यक्तीला नेहमी थकवा जाणवतो.

   

*आता आपण तांत्रिकदृष्ट्या या जीवनसत्वाचे महत्त्व समजून घेऊया.*

जीवनसत्त्व ‘ड’ हे कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांच्या शोषणाला मदत करते. हाडे तयार करणे आणि त्यांच्या ठिसूळपणापासून प्रतिबंध करणे. पेशींच्या निर्मितीत भाग घेणे आणि बाधित अथवा विकृत पेशींचा नाश करणे. प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करणे.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


https://chat.whatsapp.com/EiFGDjj0bY0B1VwZpV3ebm



*व्हिटँमीन डी ची कमी असल्यास काय समस्या तयार होतात ते पाहू.*

१)हायपरटेंशन किंवा उच्च रक्तदाब जाणवतो.

२)स्नायू आणि शरीरावर तणाव शरीरात अचानक वेदना.

३)निराशा आवश्यकतेपेक्षा अधिक वाढते,मानसिक त्रास होतो.

४)शरीर लहान-सहान रोगांना पेलू शकत नाही

५)घाम फुटतो,चिडचिडही होते.

६)मूड स्विंग होतो.

७)थकवा आणि आळस.

८)स्मरणशक्ती कमी होतेआणि भ्रम निर्माण होतात.

९) लहान मुलांमध्ये आणि प्रौढ अवस्थेत मुडदूस (रिकेट्‌स) हा आजार.

१०)वजन वाढते.

११)एखादी जखम झाल्यास लवकर भरत नाही.

१२)पचन विकृती तयार होते.

१३)केसांची गळती.

१४)प्रतिकारशक्ती कमी होऊन शरीर कायम बँक्टेरीयल व व्हायरल इनफेक्शन ची शिकार होतं.

१५)हाडात ठिसूळ ता आल्याने सारखं सारखं फँक्चर होण्याचा धोका, आँस्टीओपाँरोसीस ही होऊ शकतो.

१६)हार्मोनल इनबँलन्स होतो.

१७)कोल्ँस्ट्राँल चे कार्य बिघडते.

१८)पित्ताचा त्रास वाढू शकतो.

[12/20, 6:38 PM] वैद्य गजानन:

         *रक्त तपासणी.*

याचे शरीरातील ‘हाफ लाइफ’ (ज्ञात उधळण्याचा कालावधी) फक्त आठ तासांचा असून व्हिटॅमिन ‘डी टोटल’चा हाच कालावधी सुमारे पंचवीस दिवसांचा असतो. यामुळे व्हिटॅमिन ‘डी टोटल’ हीच चाचणी सर्वात जास्त ग्राह्य मानण्यात येते. ‘डी ३’ लिहिलेले असले तरीही व्हिटॅमिन ‘डी टोटल’ हीच चाचणी औषधोपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना बहुतांश वेळा अपेक्षित असते. व्हिटॅमिन ‘डी टोटल’ ही चाचणी रक्तातून होते आणि त्याचा नमुना कधीही देता येतो. याच्या सामान्य पातळीचे प्रमाण ३० ते ७० असते.

या अनुशंगाने ज्या भागावर याचा प्रभाव पडतो त्या भागांच्या टेस्ट ही केल्या जातात.

*कसे तयार होते हे जीवनसत्त्व.* *शरीरात कुठल्या रुपात कार्यरत असते.*

व्हिटॅमिन ‘डी’ म्हणजेच व्हिटॅमिन ‘डी टोटल’ असून ते ‘डी २’ आणि ‘डी ३’ या प्रकारांनी बनलेले असते. ‘डी २’ हे वनस्पतीजन्य असून ‘डी ३’ हे सूर्यप्रकाशातून, तसेच प्राणिज पदार्थांमधून मिळते.  

 व्हिटॅमिन ‘डी २’ आणि ‘डी ३’ हे दोन्हीही प्रकार हे थेट परिणामकारक नसतात. त्यांच्यावर यकृत आणि मूत्रपिंड यांमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर कॅल्सीट्रॉल नावाच्या संयुगात होत आणि हा प्रकार व्हिटॅमिन ‘डी’चा उपयुक्त प्रकार असतो.

        [12/20, 7:19 PM] वैद्य गजानन:

           *व्हिटँमीन डी नँचरली कशातून मिळत असते शरीराला.*

१)सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन ‘डी ३’ त्वचेखाली तयार होते.आठवड्यात दोन वेळा अर्धा-अर्धा तास कोणतेही लोशन न लावता शरीराच्या मोठ्या 

भागावर सूर्यकिरण पडल्यास त्या मात्रेत हे व्हिटॅमिन तयार होते. उन्हातून फिरणे कमी झाल्यामुळे हल्ली बहुतांश लोकात याची कमतरता आढळते.

२)याचा मुख्य स्रोत प्राणिज पदार्थ असतात. मटण, लिव्हर, लिव्हर ऑइल,मासे,

३)अंड्याचा पिवळा बलक.

४)दूध आणि चीज. 


*कमतरता कोणाला जाणवते.*

१)उन्हातून फिरणे कमी झाल्यामुळे हल्ली बहुतांश लोकात याची कमतरता आढळते. २)यकृत, मूत्रपिंड यांच्या आजारात शोषणप्रक्रियेत आणि विघटनप्रक्रियेत अडथळा आल्याने कमतरता उद्भवते. ३)काळ्या व्यक्तींमध्ये त्वचेतून सूर्यकिरणे शोधण्याच्या प्रक्रियेला मेलॅनिन नावाचे द्रव्य प्रतिरोध करते अन्‌ त्यामुळे त्यांच्यात कमतरतेचे प्रमाण अधिक असते.

४) वृद्ध मंडळी आणि स्तन्यपान देणाऱ्या माता यांच्यामध्येही कमतरता जास्त प्रमाणात आढळते.

५)गँस्ट्रीक बायपास सर्जरी झालेले,आँस्टीओपाँरोसीस, टिबी, थायराँईड, लिम्फोमा चे कँन्सर ग्रस्त,इ .मंडळी ना ही याची कमतरता भासते.

६)अँन्टीफंगल,एडस,कँन्सर,टिबी,कोलेस्टेरॉल च्या काही औषधा मुळे ही शरीरातील ह्या जीवनसत्वाची कमतरता भासते.

७)पाच वर्षापेक्षा कमी वयाची मुले.पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाचे वृध्द.


          [12/20, 7:51 PM] वैद्य गजानन:

*कशी भरून काढावी कमतरता.*

१)मासे हे जीवनसत्व मिळवण्याचे मोठे स्त्रोत असून यात काँड लिव्हर आँईलच्या गोळ्याचे सेवन आपण करू शकता.माशात पेडवा,रावस,व बांगडा ही कोकणात तसे *आमच्या गोव्यात* आढळणारी मच्छी आहारात जास्त असल्यास याची कमतरता भरून निघते.

२)मशरूम, सोयामिल्क,वेगवेगळी धान्य ही याचा नँचरल सोर्स आहेत.

३)चिकन,मटण यातील लिव्हर हे यासाठी बेस्ट आहे.

४)पनीर सह सारी डेरी प्राँडक्ट ही यासाठी बेस्ट आँफशन आहेत.

५)नेहमी अंडी खाणे ही या व्यक्तींना फायदेशीर आहे विशेषतः पिवळा बलक.

६)रोज नियमित संत्र्याचा ज्यूस प्यायल्यास ही याची कमतरता भरून येते.

    या पोस्ट च्या माध्यमातून आपल्याला या जीवनसत्त्वाचे महत्त्व ,कमतरतेमुळे होणारे त्रास,उणीव कशी भरून काढावी यासंबंधी विस्तृत माहिती देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आशा आहे आपणास ही पोस्ट ही इतर पोस्ट इतकीच आवडेल.


वैद्य. गजानन.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi