Friday, 10 March 2023

आरोग्य सेविकांची दोन महिन्यांत भरती

 आरोग्य सेविकांची दोन महिन्यांत भरती

- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन.

            मुंबई, दि. 10 : गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य सेविकांची भरती झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र येत्या दोन महिन्याच्या आत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            विधानसभा सदस्य रवी राणा, वैभव नाईक, मनीषा चौधरी यांनी आरोग्य सेविकांची पदभरतीबाबचा प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, भरती प्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या संस्थेमार्फत अर्ज छाननी प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi