Friday, 10 March 2023

कांदा लसूण वर्ज का

 🌹 *कांदा लसूण वर्ज का* 🌹



---------------------------------------------------------

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

---------------------------------------------------------


पुराणांमध्ये कांदा आणि लसूण कसे निर्माण झाले याची एक कथा दिली आहे. त्या कथेत असं म्हटलंय की अमृतमंथनानंतर जेव्हा अमृताचं वाटप होत होतं त्यावेळी विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं आणि सगळ्यात आधी देवांना अमृत दिलं. राहूच्या हे लक्षात आलं. त्यानं विष्णूचा हा कावा बरोब्बर ओळखला आणि तो रूप बदलून देवांमध्ये जाऊन बसला. थोडक्यात, त्यालाही अमृत मिळालं. राहू ते अमृत पीत असताना चंद्र आणि सूर्याने त्याची चुगली केली. विष्णूला मग राहूचा राग आला आणि त्यानं आपल्या सुदर्शन चक्रानं राहूचं डोकं उडवलं. त्यावेळी राहूच्या रक्ताचे काही थेंब धरतीवर पडले आणि त्यातून कांदा आणि लसूण निर्माण झाला असं या कथेत सांगण्यात आलंय. राहू हा असुर होता. त्याच्या रक्तापासून निर्माण झालेले असल्यामुळे कांदा-लसूण खाऊ नये असं या कथेनुसार मानण्यात येतं. 

आयुर्वेद मानतो की आपल्या शरीरात सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण असतात. त्यातला तम हा गुण स्थितीदर्शक आहे. म्हणजे ज्याच्याकडे तम जास्त असेल, तो माणूस आहे आहे त्या स्थितीतच राहतो. काही कष्ट करावेत, कामं करावीत आणि आयुष्यात यश मिळवावं असं काहीही त्या माणसाकडून केलं जात नाही असं मानलं जातं. म्हणजे यात विद्यार्थ्याच्या अभ्यासापासून ते नोकरी-बिझनेसमधले कष्ट हे सगळेच आले. थोडक्यात, तम वाढवणारं अन्न आपल्या आयुष्यात अज्ञानाचा अंधार आणतो अशी खूप जुनी समजूत आहे. आणि आपला हा कांदा आणि लसूण दोघेही तामसिक! त्यामुळेच कांदा आणि लसूण खाऊ नये अशी एक धारणा आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi