Monday, 6 February 2023

ताडदेवमधील दादरकर कंपाऊंडला रस्ता उपलब्ध करून नागरिकांची गैरसोय टाळावी

 ताडदेवमधील दादरकर कंपाऊंडला रस्ता उपलब्ध करून 

नागरिकांची गैरसोय टाळावी  


- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा.

            मुंबई, दि. 6 : ताडदेव येथील रहेजा एक्सलस यांनी रस्ता गेट लावून बंद केलेला आहे, तो रस्ता मोकळा करावा जेणेकरुन दादरकर कंपाऊंडला रस्ता उपलब्ध होईल आणि नागरिकांची गैरसोय टाळावी, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.


               मंत्रालय येथील दालनात ताडदेव येथील नागरिकांच्या रस्त्याच्या समस्येसंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त शरद निवृत्ती उघडे, कार्यकारी अभियंता संजय निर्मल, जयंत वालवटकर यासह इतर अधिकारी उपस्थित होते.


                 मंत्री श्री.लोढा म्हणाले, आज ताडदेव या ठिकाणी भेट दिली आहे. तातडीने या विषयी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. रहेजा एक्सलस यांनी गेट लावून रस्ता बंद केलेला आहे, तो रस्ता मोकळा करावा जेणेकरुन दादरकर कंपाऊंडला रस्ता उपलब्ध होईल. या विषयाच्या अनुषंगाने सर्व शासकीय परवानग्या घेवून योग्य ती कार्यवाही प्रत्येक विभागाने गतीने करावी जेणेकरून नागरिकांची गैरसोय टळेल .मुख्य अभियंता(विकास विभाग) यांनी सुनावणी घेऊन पोटविभागणीबाबत निर्णय द्यावा, दादरकर कंपाऊंडला लागून असलेला 22 फुट रस्ता महानगरपालिका अधिनियम अन्वये घोषित करण्याकरिता इस्टेट विभागाने कार्यवाही करावी. तसेच 09 मीटर रस्ता रुंद करण्याकरिता सर्व्हेक्षण करुन सहाय्यक अभियंता यांनी प्रस्ताव महापालिका आयुक्त यांना प्रस्ताव सादर करावा अशा विविध विषयाच्या अनुषंगाने चर्चा होऊन यासंदर्भात संबधित यंत्रणांना कार्यवाही करावी, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi