दिलखुलास' कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत.
मुंबई, दि. 18: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सोमवार दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.
राज्यात येत्या 21 फेब्रुवारीपासून इयत्ता 12 वी व 2 मार्च 2023 पासून इयत्ता 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षांना सुरूवात होत आहे. कोविडनंतर यावर्षी अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून काटेकोरपणे नियोजन करुन विशेष मोहिमही राबविण्यात येणार आहे. तसेच या काळात परीक्षा केंद्रांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेचीही मदत घेण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा देतांना अडचणी येऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठीचे शासनाचे धोरण तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांबाबत शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
0000
No comments:
Post a Comment