अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठीविधानपरिषद सदस्यांकरिता कृतीसत्र.
मुंबई, दि 18. : महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि. 27 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी विधानपरिषदेतील आमदारांकरिता दि. 21 फेब्रुवारी रोजी विधानभवनात कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी 2.30 ते सांयकाळी 5.30 यावेळेत विधानभवनाच्या पहिल्या मजल्यावरील कक्ष क्र. 118 येथे हे कृतीसत्र होणार आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे या एक दिवसीय कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध संसदीय आयुधे, त्याचा वापर आणि वैशिष्ट्ये, विधयके, अर्थसंकल्प आणि पुरवणी मागण्या या विषयांवर व्याख्याने होणार आहेत.
०००००
No comments:
Post a Comment