Saturday, 12 November 2022

लाचेची यशस्वी सापळा कारवाई अहवाल*

 *आदरणीय सर, 

*लाचेची यशस्वी सापळा कारवाई अहवाल* 


▶️ **युनिट* - नवी मुंबई


▶️ *तक्रारदार-* पुरुष 

        वय-27 वर्षें,


▶️ *आरोपी-* 

1) श्रीमती मीनल कृष्णा दळवी, वय 49 वर्षे, पद .तहसीलदार, अलिबाग- रायगड (वर्ग 1)

 *2)* राकेश रमाकांत चव्हाण वय 49 वर्षे (एजंट)खाजगी इसम 


▶️ *तक्रार प्राप्त -* 

दि. 28/09/2022


▶️ *पडताळणी* - 

दि 29/09/2022 व

दि 11/11/2022 रोजी


▶️ **लाचेची मागणी-* 1) आरोपी क्रमांक 2 यांनी रु 3,00,000/- रुपये लाचेची मागणी केली

2) आरोपी क्रमांक 1 यांनी तीन लाख रुपयांची मागणी करून तडजोडी अंती रु 2,00,000/- लाचेची रकमेची मागणी केली व लाचेची रक्कम आरोपी क्रमांक 2 यांचेकडे देण्यास तक्रारदार याना सांगितले.


▶️ **सापळा कारवाई* 

दि 11/11/2022


▶️ *स्वीकारली रक्कम* . 2,00,000/-


▶️ *लाचेचे कारण -*. तक्रारदार यांचे सासरे यांचे नावे जमिनीचा सातबारा नोंद होण्यासाठी आदेश देण्याकरिता व अपिल प्रकरणाचा निकाल तक्रारदार यांचे सासरे यांचे बाजूने देण्यासाठी आरोपी क्रमांक 2 यांनी स्वतःसाठी व आरोपी क्रमांक 1 यांचे साठी रु 3,00,000/- लाचेची मागणी केली. तसेच आरोपी क्रमांक 1 यांनी रु 3,00,000/- रकमेची मागणी करून तडजोडी अंती रु 2,00,000/- लाचेची रकमेची मागणी करून लाचेची रक्कम आरोपी क्रमांक 2 एजंट यांच्याकडे देण्यास सांगितले त्यानुसार आरोपी क्रमांक 2 यांनी तक्रारदार यांचेकडून रु 2,00,000/- अलिबाग नगरपालिका इमारतीच्या समोर आर के इलेक्ट्रॉनिक शॉप मध्ये पंचा समक्ष स्वीकारले असता आरोपी क्रमांक 2 यास 17:48 वाजता रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यानंतर आरोपी क्रमांक 1 यांना ताब्यात घेण्यात आले आहे.


▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी -* मा सचिव, महसूल विभाग, मंत्रालय, मुंबई     

                                                      

▶️ *पर्यवेक्षण अधिकारी-* श्रीमती ज्योती देशमुख, पोलीस उप अधीक्षक, एसीबी नवी मुंबई,


▶️ *सापळा अधिकारी* - श्री शिवराज बेंद्रे, पोलीस निरीक्षक, एसीबी, नवी मुंबई       


▶️ *सापळा पथक* :- पोहवा पवार, चालक पोहवा गायकवाड, पोना ताम्हाणेकर, पोना नाईक, पोना आयरे, मपोना सावंत, मपोना विश्वासराव, पो शि चव्हाण, पोशि माने


▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-

*मा.श्री.सुनिल लोखंडे, पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र*

*मा.श्री.अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र*


------------------------------------


*ठाणे परिक्षेत्रातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट ) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*

------------+++++++++----

**अँन्टी करप्शन ब्युरो, नवी मुंबई* 

*दुरध्वनी 022-27833344*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

=================

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi