Thursday, 20 October 2022

अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे

 अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करण्याचेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

 

            मुंबईदि. 19 : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले कीअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावाअशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi