ऑक्टोबर रोजी ‘नैसर्गिक शेती’ कार्यशाळेचे आयोजन
पुणे, दि. ४ : कृषि विभागामार्फत गुरूवार, ६ ऑक्टोबर रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे ‘नैसर्गिक शेती’ संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेकडून (आत्मा) देण्यात आली आहे.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आदी या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत.
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कुरुक्षेत्र हरियाणा येथे केलेले नैसर्गिक शेतीचे प्रयोग आणि प्रसाराबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.
२ हजार शेतकऱ्यांचा सहभाग
राज्यभरातून सुमारे २ हजारावर शेतकरी या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. तांत्रिक सत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच नैसर्गिक शेती करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अनुभव ऐकायला मिळणार आहेत. कार्यशाळेला जोडून नैसर्गिक शेतीबाबतच्या एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण कृषि विभागाच्या युट्यूब चॅनलवर https://www.youtube.com/c/
या कार्यशाळेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माचे कृषि संचालक दशरथ तांभाळे यांनी केले आहे.
००००
No comments:
Post a Comment