Friday, 7 October 2022

कराड - चिपळूण राष्ट्रीय महामार्ग

 कराड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा

मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून आढावा

 

            मुंबई दि. 6 : कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामाबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रालयात आढावा घेतला.

            मंत्री श्री.देसाई म्हणालेनाडेमल्हारपेठआडूळम्हावशी या गावातील अपूर्ण राहिलेली कामे तत्काळ पूर्ण करावी. हेळवाक ते ढाणकल रस्त्याचे डांबरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे. पाटण ते संगमनगर नव्याने होणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. तसेच कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित रस्त्याची कामे एल अँड टी कंपनीने तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना संबंधितांना मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

            या बैठकीस साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडामुख्य अभियंता संतोष शेलारअधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi