Wednesday, 28 September 2022

व्हॅट अभय योजना

 व्हॅट’ अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ची मागणी

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे दिले निवेदन

मुंबई ‘ 2017 मध्ये जीएसटी लागु होण्यापूर्वीच्या काळातील व्हॅट कर प्रणालीमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणासाठी राज्यशासनाने 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी लागू केलेल्या ‘अभय योजनेस’ 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ च्या वतीने केल्याची माहीती अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

उपमु‘यमंत्री व अर्थमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात चेंबरतर्फे

= 30 सप्टेंबर ही ऑडीटेड आयकर विवरणपत्रासाठीची अखेर तारीख असल्याने सनदी लेखापाल (CA ), विक्रीकर/व्हॅट योजनेसाठी आवश्यक माहीती संकलीत करण्यासाठी उपलब्ध होत नाहीत.

= गेल्या दोन वर्षातील कोरोना, महापूर सारख्या आपत्तीमुळे व्यापार, उद्योजक मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले असल्याने बरेच व्यापारी दिलेल्या मुदतीत फायदा घेण्यास असमर्थ ठरत आहेत.

= अखेरच्या टप्प्यातच सर्वजण आपली माहीती दाखल करायचा प्रयत्न करत असल्याने सर्व्हर वारंवार बंद पडल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

= सवलत योजनेतील रकमा भरण्यासाठी येत्या सणासुदीनंतर व्यापारी-उद्योजकांच्याकडे आवश्यक व्यवस्था करणे सोयीचे होणार आहे.

= अद्याप सुमारे 50 टक्के प्रकरणे दाखल होणे बाकी आहेत. या सर्वांना उर्वरीत तीन दिवसात दाखल करणे अशक्य आहे. याप्रकरणांमध्ये सरकारचा महसुल मोठ्या प्रमाणात अडकलेला आहे. मुदतवाढीमुळे तो जमा होऊ शकेल.

या विविध कारणास्तव मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचे सांगितले असल्याची माहीतीही ललित गांधी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi