Friday, 5 August 2022

 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सुमारे 78 टक्के मतदान

            मुंबई, दि. 4 (रा.नि.आ.): राज्यातील विविध 15 जिल्ह्यांमधील 62 तालुक्यातील 238 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 78 टक्के मतदान झाले.

            राज्य निवडणूक आयोगाने 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 29 जून 2022 रोजी घोषणा केली होती. त्यातील 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात 238 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. सर्व ठिकाणी मतमोजणी 5 ऑगस्ट 2022 रोजी होईल.

            मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: नाशिक- 36, धुळे- 41, जळगाव- 20, अहमदनगर- 13, पुणे- 17, सोलापूर- 25, सातारा- 7, सांगली- 1, औरंगाबाद- 16, बीड- 13, परभणी- 2, उस्मानाबाद- 9, जालना- 27, लातूर- 6, आणि बुलडाणा- 5. एकूण- 238.  

००००



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi